पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर मोहम्मद शमीवर शिव्यांचा भडीमार, सोशल मीडियावर ट्रोलिंग, सेहवाग-ओवैसी ट्रोलर्सवर भडकले
टी-20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानकडून 10 गडी राखून पराभव झाला. विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानने पहिल्यांदाच भारताचा पराभव केला आहे, अशा परिस्थितीत चाहत्यांचा राग सोशल मीडियावर उफाळून येत आहे.
मुंबई : टी-20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानकडून 10 गडी राखून पराभव झाला. विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानने पहिल्यांदाच भारताचा पराभव केला आहे, अशा परिस्थितीत चाहत्यांचा राग सोशल मीडियावर उफाळून येत आहे. पाकिस्तानच्या हातून झालेल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे, त्यानंतर अनेक माजी क्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या बचावासाठी पुढे आले आहेत. (T20 World Cup : Mohammed Shami faces online abuse after India’s loss to Pakistan)
पाकिस्तानविरुद्ध मोहम्मद शमीने 3.5 षटकात 43 धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर पाकिस्तानच्या सलामीवीरांनी 6 चौकार, एक षटकार ठोकला. या खराब कामगिरीनंतर लोकांनी मोहम्मद शमीला सोशल मीडियावर ट्रोल केले आणि त्याच्यावर उलट-सुलट आरोप केले आहेत. मोहम्मद शमीच्या विरोधात ट्विटरवर अनेक गोष्टी लिहिल्या जात आहेत.
विरेंद्र सेहवागने सुनावलं
शमीवरील टीकेनंतर माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने अशा लोकांना खडसावले आहे. वीरेंद्र सेहवागने ट्विट केले आहे की, मोहम्मद शमीवरील ऑनलाइन हल्ल्याचा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. आम्ही मोहम्मद शमीच्या पाठीशी उभे आहोत, तो एक चॅम्पियन आहे आणि जो कोणी खेळाडू इंडियन कॅप परिधान करतो त्याच्या मनात भारत आहे. शमी आम्ही तुझ्यासोबत आहोत, पुढील सामन्यात तुझा जलवा दाखव.
The online attack on Mohammad Shami is shocking and we stand by him. He is a champion and Anyone who wears the India cap has India in their hearts far more than any online mob. With you Shami. Agle match mein dikado jalwa.
— Virender Sehwag (@virendersehwag) October 25, 2021
ओवैसींचा शमीला पाठिंबा
हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही या विषयावर मत व्यक्त केले आहे. काल भारत पाकिस्तान सामन्यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला लक्ष्य केले जात असल्याचे असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले. ते म्हणाले की, या प्रकरणावरून देशात द्वेष किती वाढला आहे, हे लक्षात येते. संघात 11 खेळाडू आहेत आणि एक मुस्लिम खेळाडू आहे, हे लोक त्याला लक्ष्य करत आहेत, हा द्वेष कोण पसरवत आहे?
#MohammedShami was one of 11 players who lost last night, he wasn’t the only player on the field. Team India your BLM knee taking counts for nothing if you can’t stand up for your team mate who is being horribly abused & trolled on social media.
— Omar Abdullah (@OmarAbdullah) October 25, 2021
भारताचा दारुण पराभव
अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात सुरुवातीलाच खराब सुरुवात आणि सुमार फलंदाजीमुळे भारतीय संघ पराभूत झाला. आधी खराब फलंदाजीमुळे केवळ 151 धावा भारताने केल्या. ज्यानंतर पाकिस्तान संघाने अप्रतिम अशी फलंदाजी करत सामना 10 विकेट्सने खिशात घातला. विशेष म्हणजे पाकच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतकं ठोकली.
भारताची अत्यंत सुमार फलंदाजी
सर्वात आधी पाकिस्तानने नाणेफेक जिंकली त्यामुळे जिंकणारा संघ निवडेल अशी गोलंदाजीच त्यांनी निवडली. ज्यानंतर भारतीय फलंदाज मैदानात आले. यामध्ये फलंदाजीची सर्वाधिक मदार असलेल्या सलामीवीर रोहित आणि राहुल यांनी अवघे 0 आणि 3 रन केले. संपूर्ण सामन्यात विराट आणि ऋषभने केवळ झुंज दिली. यात कोहलीने 57 आणि पंतने 39 धावा केल्या. त्यानंतर कोणालाच खास कामगिरी करत आल्याने संपूर्ण संघाचा डाव 151 धावांवर 20 ओव्हरमध्ये आटोपला.
पाकिस्तानचा दमदार विजय
152 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानने सुरुवातीपासूनच फलंदाजीमध्ये एक वेगळाच क्लास दाखवला. दोन्ही सलामीवीर बाबर आजम आणि रिजवान यांनी उत्कृष्ट अर्धशतक झळकावली. बाबरने 52 चेंडूत 68 धावा केल्या. तर रिजवानने 55 चेंडूत 79 धावा केल्या. भारताच्या एकाही गोलंदाजाला खास तर नाही किमान सुमार गोलंदाजीही करता आली नाही. एकही विकेट न घेता आल्याने भारताचा 10 विकेट्सनी लाजिरवाणा पराभव झाला आहे.
इतर बातम्या
India vs Pakistan : पाकिस्तानी खेळाडू आणि विराटच्या मिठीची जगभर चर्चा, Video तुफान व्हायरल
T20 World Cup 2021 मध्ये भारत-पाकिस्तान पुन्हा भिडू शकतात, वाचा कसा, कुठे होऊ शकतो आमना-सामना
(T20 World Cup : Mohammed Shami faces online abuse after India’s loss to Pakistan)