IND vs PAK: 1.46 कोटी रुपये ही घराची किमत नाही तर भारत-पाकिस्तान सामन्यातील एक तिकीट
India vs Pakistan T20 World Cup Match : मार्च-एप्रिलपासून या सामन्याच्या तिकिटांबाबत जोरदार चर्चा सुरू होती. त्यानंतर सर्व तिकिटे विकली गेली आहे. भारत आणि पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांची मागणी 200 पट असल्याचे आयसीसीने म्हटले होते.
भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट प्रेमीच नाही तर जगभरातील क्रिकेट प्रेमी भारत-पाकिस्तान सामन्याची वाट पाहत आहेत. या सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी अनेक क्रिकेट रसिकांचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु अनेकांना तिकीट मिळवण्यात अपयश आले. यामुळे भारत-पाकिस्तानमधील सामन्याचे तिकीट प्रचंड महाग झाले. न्यूयॉर्कमधील भारत-पाकिस्तान सामन्यात एका तिकिटाची किमत ऐकल्यावर तुम्हाला जबरदस्त धक्का बसणार आहे. या सामन्याचे तिकीट मुंबईतील एखाद्या फ्लॅटपेक्षाही महाग झाले आहे. 1.46 कोटी रुपये एका तिकिटाची किमत आहे.
किती आहे त्या तिकिटाची किमत
टी20 वर्ल्ड कप 2024 सुरु झाला आहे. या वर्ल्ड कपमध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. न्यूयॉर्कमधील नसाउ इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. या मैदानाची क्षमता जवळपास 34,000 आहे. या स्टेडियममध्ये एक सीट 252 सेक्सनमध्ये 20व्या रांगेत आहे. 30 क्रमांकाचे हे सीट आहे. या सीटची किंमत 174,400 US डॉलर म्हणजेच अंदाजे 1.46 कोटी रुपये आहे.
साधारणत: मुंबई, पुण्यातील लग्झरी फ्लॅट इतका महाग असतो. परंतु भारत-पाकिस्तान मॅचचा असा जोश आहे की एका सीटची किंमत कोटींवर पोहोचली आहे. मात्र, ही किंमत आयसीसीची नाही. खरं तर, Stubhub पपवरील आहे. या ठिकाणी तिकिटांची पुनर्विक्री केली जाते. अमेरिकेमध्ये ही विक्री पूर्णपणे कायदेशीर आहे. या सीटची किंमत 1.46 कोटी रुपये आहे. या तिकिटासाठी बोली लावली जाऊ शकते. परंतु एका तिकिटाची इतकी किंमत ठेवणे आश्चर्यकारक आहे.
भारत- पाकिस्तान सामन्यात तिकिटाची मागणी 200 पट
मार्च-एप्रिलपासून या सामन्याच्या तिकिटांबाबत जोरदार चर्चा सुरू होती. त्यानंतर सर्व तिकिटे विकली गेली आहे. भारत आणि पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांची मागणी 200 पट असल्याचे आयसीसीने म्हटले होते. त्यावेळी ज्या लोकांनी तिकिटे घेतली होती ते आता ही तिकिटे पुन्हा विकून प्रचंड नफा कमावत आहेत.
नासाऊ काऊंटीमधील वातावरण बेभरवशी आहे, त्यामुळे सामन्याबद्दल काहीही सांगता येणार नाही. नासाऊ काउंटीमध्ये 9 जून रोजी सकाळी हवामान चांगले राहणार नाही आणि पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.