T20 WC: पाकिस्तानने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारली, बाबर आजमने हे कोणाला निवडलं?
T20 WC: क्रिकेट टीमची निवड करणं, हे सोपं काम नाहीय. खासकरुन वर्ल्ड कप सारख्या टुर्नामेंटसाठी टीम निवडताना खूप काळजी घ्यावी लागते. भारत-पाकिस्तान सारख्या टीमची निवड करताना काही चांगले पर्याय उपलब्ध असतात.
मुंबई: क्रिकेट टीमची निवड करणं, हे सोपं काम नाहीय. खासकरुन वर्ल्ड कप सारख्या टुर्नामेंटसाठी टीम निवडताना खूप काळजी घ्यावी लागते. भारत-पाकिस्तान सारख्या टीमची निवड करताना काही चांगले पर्याय उपलब्ध असतात. पण तरीही कुठेना कुठे कमतरता राहतेच. गुरुवारी टी 20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानची टीम जाहीर झाली. या टीममध्ये शान मसूदची निवड करण्यात आलीय. तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पण ही निवड पाकिस्तानी टीमला भारी पडू शकते.
पाकिस्तानी टीममध्ये बदलाची मागणी
मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कप आणि यंदा आशिया कप स्पर्धा जिंकण्याची पाकिस्तानला संधी होती. पण दोन्हीवेळा अंतिम फेरीच्या जवळ पोहोचून त्यांनी काही चूका केल्या. त्यामुळे यंदा पाकिस्तानी टीममध्ये बदल करण्याची मागणी सुरु होती.
सलामीला येऊन त्यांची धीमी फलंदाजी
कॅप्टन बाबर आजम आणि मोहम्मद रिजवानची जोडी टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. कारण सलामीला येऊन ते धीमी फलंदाजी करतात, असं पाकिस्तानी चाहत्यांच मत आहे. त्याशिवाय मीडिल ऑर्डर बळकट करण्याचीही गरज आहे. पाकिस्तानी सिलेक्टर्सनी टी 20 वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या टीममध्ये फार बदल केलेले नाहीत. पण एका कसोटीचा अनुभव असलेल्या शान मसूदला टीममध्ये स्थान दिलय. त्याचा फखर झमनच्या जागी टीममध्ये समावेश केलाय.
शान मसूदचा रेकॉर्ड काय आहे?
शान मसूद यावर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रत्येक फॉर्मेटमध्ये दमदार प्रदर्शन करतोय. त्यामुळेच पाकिस्तानी टीममध्ये त्याचा समावेश करण्याची मागणी सुरु होती. सिलेक्टर्सनी क्रिकेट विश्लेषकांची ही मागणी मान्य केली. शान मसूदचा टीममध्ये समावेश केला. पण आता शान मसूदला स्थान देऊन पाकिस्तानने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारली नाही ना? अशी चर्चा सुरु आहे. कारण शान मसूद अजूनपर्यंत टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही.
किती स्ट्राइक रेट आहे?
तो देशांर्तगत टी 20 लीगमध्ये खेळतो. तिथे त्याचा रेकॉर्ड फार खास नाहीय. हा डावखुरा फलंदाज एकूण 117 टी 20 सामने खेळलाय. त्यात त्याने 27 च्या सरासरीने 2996 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट फक्त 126 आहे.