T20 World Cup: राहुल द्रविड ‘या’ तीन बॉलर्सना टीम इंडियासोबत घेऊन जाणार ऑस्ट्रेलियाला
T20 World Cup: कोण आहेत ते बॉलर्स? वर्ल्ड कपसाठी 'त्या' तिघांना ऑस्ट्रेलियाला घेऊन जाण्यामागे उद्देश काय?
मुंबई: पुढच्या तीन आठवड्यात T20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरु होणार आहे. सर्वच टीम तयारीच्या अंतिम टप्प्यात आहेत. वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा आधीच झाली आहे. पुढच्या दोन-तीन दिवसात टीम वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. या टीमसोबत कुलदीप सेन, चेतन साकारीया आणि मुकेश चौधरी हे तीन गोलंदाज सुद्धा ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत. नेट बॉलर म्हणून ते टीमसोबत ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत. स्पोर्टस्टारने हे वृत्त दिलय.
कधी रवाना होणार?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी 20 मालिका संपल्यानंतर टीम इंडिया 6 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. कुलदीप, चेतनसोबत उमरान मलिकही ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या विमानात असेल.
ते तिघे इराणी कपमध्ये खेळतायत
दीपक चाहर, श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमी हे वर्ल्ड कपसाठीचे टीम इंडियाचे स्टँडबाय खेळाडू आहेत. चेतन, कुलदीप आणि उमरान तिघांची चालू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजसाठी टीम इंडियात निवड झालेली नाही. सध्या ते इराणी कप स्पर्धेत रेस्ट ऑफ इंडियाकडून खेळतायत.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी
चेतन आणि मुकेश डावखुरे वेगवान गोलंदाज आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केलीय. कुलदीप सेनही देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतोय.
गोलंदाजी चिंतेचा विषय
टीम इंडियासाठी गोलंदाजी चिंतेचा विषय आहे. कारण डेथ ओव्हर्समध्ये भारतीय गोलंदाज मोठ्या प्रमाणात धावा देत आहेत. कालही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाने 238 धावांचं मोठं लक्ष्य दिलं होतं.
पण तरीही दक्षिण आफ्रिकेचा अवघ्या 16 धावांनी पराभव झाला. ते 221 धावांपर्यंत पोहोचले. टीम इंडियाच्या गोलंदाजांना चौथी विकेट काढता आली नाही. डि कॉक-डेविड मिलर जोडीने टीम इंडियाची गोलंदाजी फोडून काढली. रोहितने गोलंदाजी चिंतेचा विषय असल्याचं मान्य केलं आहे.