सुपर 8 फेरीत अमेरिकेची दक्षिण अफ्रिकेला कडवी झुंज, पराभवानंतर कर्णधार आरोन जोन्स म्हणाला…

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील पहिलाच सामना जबरदस्त रंगला. अमेरिकेने दक्षिण अफ्रिकेला कडवी झुंज दिली. फक्त 18 धावांनी अमेरिकेचा पराभव झाला. त्यामुळे अमेरिका या फेरीत देखील उलटफेर करू शकते, असंच दिसत आहे. या सामन्यानंतर कर्णधार आरोन जोन्सने प्रतिक्रिया दिली.

सुपर 8 फेरीत अमेरिकेची दक्षिण अफ्रिकेला कडवी झुंज, पराभवानंतर कर्णधार आरोन जोन्स म्हणाला...
Follow us
| Updated on: Jun 19, 2024 | 11:47 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीचा सामने सुरु झाले आहेत. या फेरीतील पहिलाच सामना अमेरिका आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पार पडला. अमेरिकेने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दक्षिण अफ्रिकेने फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमवून 194 धावा केल्या आणि विजयासाठी 195 धावा दिल्या. या सामन्यात दक्षिण अफ्रिका सहज विजय मिळवेल असं वाटत होतं. पण तसं काही झालं नाही. पहिल्यांदाच वर्ल्डकप खेळणाऱ्या अमेरिकेने दक्षिण अफ्रिकेला चांगलंच झुंजवलं. 20 षटकात 6 गडी गमवून 176 धावा केल्या. विजयासाठीच्या 18 धावा तोकड्या पडल्या आणि दक्षिण अफ्रिकेने विजय मिळवला. या सामन्यातील पराभवानंतर अमेरिकेचा कर्णधार आरोन जोन्सने प्रतिक्रिया नोंदवली आहे. थोडक्यात पण बरंच काही बोलून गेला.

“मला निराश झालो असं म्हणायचे नाही. मला वाटले की आम्ही गोलंदाजीत अधिक शिस्तबद्ध राहू शकलो असतो. पण हे कधी कधी तसं काही होत नाही. मला वाटते की आपण अधिक शिस्तबद्ध असणे आवश्यक आहे. आम्ही प्रयत्न करू आणि पुन्हा स्पर्धेत परत येऊ. पुढच्या सामन्यासाठी मजबूत तयारी करू. घरी जाताना आनंद होईल. मला परिस्थिती चांगली माहीत आहे.”, असं अमेरिकन कर्णधार आरोन जोन्सने सांगितलं. दुसरीकड, दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने गोसचं कौतुक केलं. त्याच्या खेळीमुळे विजय खूपच कठीण झाल्याचं सांगितलं. अँड्रीज गोसने 47 चेंडूत नाबाद 80 धावांची खेळी केली. यात त्याने 5 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याला इतर खेळाडूंची हवी तशी साथ मिळाली नाही. पण हरमीत सिंगने 22 चेंडूत 38 धावा केल्या.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शामसी.

युनायटेड स्टेट्स (प्लेइंग इलेव्हन): शायन जहांगीर, स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस (विकेटकिपर), आरोन जोन्स (कर्णधार), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नॉथुश केंजिगे, अली खान, सौरभ नेत्रावलकर.

Non Stop LIVE Update
उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन, ठाकरेंची जळजळीत टीका
उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन, ठाकरेंची जळजळीत टीका.
'दगा एक बार हो सकता है, बार बार...', नवनीत राणांचा बच्चू कडूंवर निशाणा
'दगा एक बार हो सकता है, बार बार...', नवनीत राणांचा बच्चू कडूंवर निशाणा.
भेटता कसले,हिम्मत असेल तर राजीनामा द्या; आव्हाडांचं दादांना खुल आव्हान
भेटता कसले,हिम्मत असेल तर राजीनामा द्या; आव्हाडांचं दादांना खुल आव्हान.
वेळ आली तर ठाकरेंसाठी तलवारीचे वार घेऊ... त्या बॅनर्सची का होतेय चर्चा
वेळ आली तर ठाकरेंसाठी तलवारीचे वार घेऊ... त्या बॅनर्सची का होतेय चर्चा.
मी कोल्हापूरचा, मला बदामाची गरज नाही; चंद्रकांत पाटील असं का म्हणाले?
मी कोल्हापूरचा, मला बदामाची गरज नाही; चंद्रकांत पाटील असं का म्हणाले?.
मी ओरिजनल,शेवटी ब्रँड हा ब्रँड, नवनीत राणांचा यशोमती ठाकूरांवर पलटवार
मी ओरिजनल,शेवटी ब्रँड हा ब्रँड, नवनीत राणांचा यशोमती ठाकूरांवर पलटवार.
मिटकरीला ना कोणता अधिकार, त्यांनी तोंड बंद ठेवाव, भाजप नेत्यान फटकारल
मिटकरीला ना कोणता अधिकार, त्यांनी तोंड बंद ठेवाव, भाजप नेत्यान फटकारल.
मोदींना आता राहुल गांधींना रामराम करावा लागेल, राऊत नेमकं काय म्हणाले?
मोदींना आता राहुल गांधींना रामराम करावा लागेल, राऊत नेमकं काय म्हणाले?.
गुन्हा आहे का?, लोकसभेतील 'त्या' घोषणेनंतर राऊतांकडून ओवैसींची पाठराखण
गुन्हा आहे का?, लोकसभेतील 'त्या' घोषणेनंतर राऊतांकडून ओवैसींची पाठराखण.
कुठला विषय शिकवता हे विचारण्याची गरज काय?,किशोर दराडेंनी कुणाला सुनावल
कुठला विषय शिकवता हे विचारण्याची गरज काय?,किशोर दराडेंनी कुणाला सुनावल.