Danushka Gunathilaka Arrested: बलात्काराच्या आरोपाखाली श्रीलंकन क्रिकेटरला ऑस्ट्रेलियात अटक

T20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियात गेलेल्या क्रिकेटपटूवर बलात्काराचा गंभीर आरोप

Danushka Gunathilaka Arrested: बलात्काराच्या आरोपाखाली श्रीलंकन क्रिकेटरला ऑस्ट्रेलियात अटक
Follow us
| Updated on: Nov 06, 2022 | 9:31 AM

सिडनी: श्रीलंकन क्रिकेटपटू दानुष्का गुणथिलकाला ऑस्ट्रेलियात अटक करण्यात आली आहे. श्रीलंकन टीमसह तो ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी गेला होता. एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक झाली आहे. टीमशी संबंधित सूत्रांनी ही माहिती दिली. 31 वर्षीय दानुष्का गुणथिलकाला अटक करुन रविवारी पहाटेच्या सुमारास सिडनी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. 2 नोव्हेंबरला दानुष्का गुणथिलकाने हे कृत्य केल्याचा आरोप आहे.

त्याच्याशिवाय श्रीलंकन टीम रवाना

बलात्काराच्या आरोपाखाली दानुष्का गुणथिलकाला अटक करण्यात आली आहे. श्रीलंकन टीम त्याच्याशिवाय मायेदशी रवाना झाली आहे. श्रीलंकन टीमशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने पीटीआयने हे वृत्त दिलय.

श्रीलंकेकडून कुठल्या मॅचमध्ये खेळला?

श्रीलंकन टीमच वर्ल्ड कपमधील आव्हान आधीच संपुष्टात आलं होतं. शनिवारी श्रीलंकेचा इंग्लंडने पराभव केला. दानुष्का गुणथिलकाला पहिल्या राऊंडमध्ये नामीबिया विरुद्ध खेळला. त्यावेळी तो शुन्यावर बाद झाला. त्यानंतर तो दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला. श्रीलंकन टीमचा नामीबियाकडून पराभव होऊनही ते सुपर 12 साठी पात्र ठरले होते.

वेबसाइटवर काय माहिती दिलीय?

न्यू साऊथ वेल्स पोलिसांनी आपल्या वेबसाइटवर या अटकेची माहिती दिलीय. त्यांनी नाव घेतलेलं नाही. फक्त श्रीलंकन नागरिकाला अटक केली, एवढाच उल्लेख आहे. रोझ बे येथे श्रीलंकन महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

ओळख कशी झाली?

दानुष्का गुणथिलकाची ऑनलाइन डेटिंग App वरुन महिलेबरोबर ओळख झाली होती. 2 नोव्हेंबर 2022 बुधवारी संध्याकाळी त्याने महिलेवर लैंगिक अत्याचार केला.

विशेष पोलिसांकडून पाहणी

तपासाचा भाग म्हणून विशेष पोलीस अधिकाऱ्यांनी रोझ बे येथील पत्त्यावर जाऊन गुन्हा घडला, त्या ठिकाणाची पाहणी केली. सिडनीच्या ससेक्स स्ट्रीटवरील हॉटेलमधून पोलिसांनी आरोपीला अटक केली. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने अजून यावर स्टेटमेंट जारी केलेलं नाही. दानुष्का गुणथिलका 3 आठवड्यापूर्वीच दुखापत झाली होती. त्याच्याजागी एशेन बनडाराचा टीममध्ये समावेश करण्यात आला होता.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.