IND vs AUS: फेव्हरेट शॉट खेळताना सूर्या चुकला, पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजानेही नको तेवढा माज दाखवला, VIDEO
IND vs AUS: 'हसू नको येड्या चेंडू स्टेडियम पार गेला असता'
मुंबई: सूर्यकुमार यादव (suryakumar yadav) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याच्या बॅटमधून सतत धावांचा पाऊस पडतोय. टी 20 वर्ल्ड कप 2022 (T20 World cup 2022) मध्ये प्रत्येकाची त्याच्यावर नजर आहे. आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध वॉर्मअप मॅचमध्ये (IND vs AUS) पुन्हा एकदा सूर्यकुमार यादवने आपली ताकत दाखवून दिली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 6 धावांनी विजय मिळवला.
सूर्यकुमार यादवने आजच्या मॅचमध्ये हाफ सेंच्युरी झळकवली. त्याने 33 चेंडूत 50 धावा फटकावल्या. सूर्याने शानदार इनिंग खेळताना 6 चौकार आणि 1 षटकार लगावला.
सूर्यकुमारची खिल्ली उडवत होता
आक्रमक बॅटिंग करताना सूर्या 20 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर केन रिचर्डसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. सूर्या कॅच आऊट झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाज रिचर्डनसला हसू आवरता आलं नाही. त्याचं हसणं पाहून तो सूर्यकुमारची खिल्ली उडवतोय असं वाटलं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. सूर्यकुमार यादववर हसणाऱ्या रिचर्ड्सनला युजर्सनी बरच सुनावलय.
हा चेंडू बाऊंड्री पार गेला असता
रिचर्डसनच्या ज्या चेंडूवर सूर्या आऊट झाला, त्यावर रिचर्डसन हसत होता. भारतीय इनिंगमध्ये रिचर्डसनने लास्ट ओव्हर टाकली. रिचर्डसनने चौथा चेंडू फुलटॉस टाकला. खरतर हा चेंडू बाऊंड्री पार गेला असता. सूर्या या चेंडूवर आपला ट्रेडमार्क शॉट खेळायला गेला. पण त्याचा अंदाज चुकला. त्याने रिचर्डसनकडे सोपा झेल दिला. रिचर्डसनला त्यानंतर हसू आवरता आलं नाही. तो तोंडावर हात ठेवून हसत होता.
View this post on Instagram
सूर्या-राहुलची हाफ सेंच्युरी
ब्रिस्बेनमध्ये आज मॅच झाली. टीम इंडियाने पहिली बॅटिंग केली. भारताने 7 विकेट गमावून 186 धावा केल्या. सूर्यकुमार शिवाय केएल राहुलने 33 चेंडूत 57 धावा केल्या. टीम इंडियाने विजयासाठी ऑस्ट्रेलियाला 187 धावांच लक्ष्य दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची टीम 180 रन्सवर ऑलआऊट झाली. ऑस्ट्रेलियाकडून कॅप्टन एरॉन फिंचने सर्वाधिक 76 धावा केल्या.