T20 World Cup: बाऊन्स असलेल्या विकेटवर तीन स्पिनर्सची गरज आहे? टीम इंडियाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह
ऑस्ट्रेलियात पुढच्या महिन्यात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. त्यासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने टीम इंडियाची घोषणा केली आहे. आज संध्याकाळी 15 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला.
मुंबई: ऑस्ट्रेलियात पुढच्या महिन्यात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. त्यासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने टीम इंडियाची घोषणा केली आहे. आज संध्याकाळी 15 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला. ही संघ निवड बॅलन्स वाटतेय. 2019 च्या वर्ल्ड कप टीममध्ये विजय शंकरची निवड वादग्रस्त ठरली होती. तसा आता कुठलाही वाद नाहीय. पण तरीही क्रिकेट पंडितांच्या मनात काही प्रश्न आहेत.
वेगवान गोलंदाजांना जास्त साथ देतात
ऑस्ट्रेलियात बाऊन्सी म्हणजे उसळी घेणाऱ्या खेळपट्टया आहेत. या विकेट्स वेगवान गोलंदाजांना जास्त साथ देतात. अशावेळी तीन स्पिनर्सची निवड अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का आहे. अक्षर पटेल, आर. अश्विन आणि युजवेंद्र चहल असे तीन फिरकी गोलंदाज या टीममध्ये आहेत.
रवींद्र जाडेजाला पर्याय म्हणून या खेळाडूची निवड
रवींद्र जाडेजा फिट असता, तर अक्षर पटेलची निवड झाली नसती. पण आशिया कप स्पर्धेत जाडेजाला गंभीर दुखापत झाली. त्याच्या गुडघ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेला जाडेजा मुकणार आहे. त्यामुळे त्याच्याजागी अक्षर पटेलची संघात निवड करण्यात आली आहे.
वेस्ट इंडिजमध्ये त्याने बॅटिंगची ताकत दाखवली
जाडेजाकडे ऑलराऊंडर म्हणून पाहिल जातं. अक्षर पटेलही तशीच कामगिरी करु शकतो. वेस्ट इंडिजमध्ये अक्षरने आपल्या बॅटिंगची ताकत दाखवून दिली होती. अक्षरकडे जाडेजाचा पर्याय म्हणून पाहिलं जातय. पण अक्षर पटेलला अजून बरच काही सिद्ध करायचं आहे. नुकतीच आशिया कप स्पर्धा संपली. या टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाकडे विजेतेपदाच दावेदार म्हणून पाहिलं जात होतं. पण टीमने सर्वांनाच धक्का दिला. त्यामुळे वर्ल्ड कपच्या टीम निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणं, स्वाभाविक आहे.