Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्यापूर्वी वसीम अक्रमने सांगितली विजयाची ट्रिक

India vs Pakistan T20 World Cup Match : टी20 वर्ल्डकपमध्ये भारताचा एक सामना झाला आहे. त्या सामन्यात भारताने आयरलँडला आठ गडी राखून पराभव केला आहे. त्या सामन्यात रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांनी जोरदार कामगिरी केली. रोहितने अर्धशतक केले होते. परंतु विराट कोहली केवळ 1 धावा करुन बाद झाला होता.

IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्यापूर्वी वसीम अक्रमने सांगितली विजयाची ट्रिक
IND vs PAK
Follow us
| Updated on: Jun 09, 2024 | 12:04 PM

IND vs PAK T20 World Cup 2024: टी20 विश्व कप 2024 मधील सर्वांचे लक्ष लागून असलेला सामना आज होत आहे. या सामन्यापूर्वी भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंनी जोरदार सराव केला. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार याने विजयाचे ट्रिक सांगितले आहे. अक्रम यांनी न्यूयॉर्कमधील खेळपट्टीवर कशी फलंदाजी करावी, कोणत्या ओव्हर महत्वाच्या असतील, यासंदर्भात माहिती दिली आहे. न्यूयॉर्कमधील स्टेडियमची खेळपट्टी स्लो आहे. यामुळे कसोटी सामन्याप्रमाणे फलंदाजी या ठिकाणी करावी लागणार आहे. तसेच शेवटची पाच षटके महत्वाची असणार आहे, असे वसीम अक्रम याने म्हटले आहे.

काय म्हणतो वसीम अक्रम

न्यूयॉर्कमधील खेळपट्टीवर 170 नाही तर 140 धावा झाल्या तरी खूप आहे. त्यासाठी कसोटी क्रिकेटप्रमाणे खेळावे लागणार आहे. यामुळे विकेट टिकून राहतील आणि शेवटच्या पाच षटकांत धावसंख्या 140 किंवा 150 पर्यंत नेता येणार आहे. प्रथम फलंदाजी करताना खेळपट्टीवर टिकून हळहळू धावफलक हलता ठेवणे गरजेचे आहे.

आतापर्यंत दोन्ही देशांत कशी राहिली परिस्थिती

भारत आणि पाकिस्तान दरम्यान आतापर्यंत 12 टी20 सामाने झाले आहेत. त्यामध्ये टीम इंडियाने 8 सामन्यात विजय मिळवला आहे. यापूर्वी दोन्ही संघात टी20 फॉर्मेटमधील शेवटचा सामना 2022 मधील टी20 विश्वकप स्पर्धेत झाला होता. त्या सामन्यात भारतने 4 विकेटने विजय मिळवला होता. त्यापूर्वी 2022 मध्ये सप्टेंबर महिन्यात दुबईत झालेल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.

हे सुद्धा वाचा

भारताचा पहिल्या सामन्यात विजय

टी20 वर्ल्डकपमध्ये भारताचा एक सामना झाला आहे. त्या सामन्यात भारताने आयरलँडला आठ गडी राखून पराभव केला आहे. त्या सामन्यात रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांनी जोरदार कामगिरी केली. रोहितने अर्धशतक केले होते. परंतु विराट कोहली केवळ 1 धावा करुन बाद झाला होता.

भारत आणि पाकिस्तान सामन्यात न्यूयॉर्क पावसाची शक्यता आहे. ज्या भागात सामना आहे, त्या नासाऊ काऊंटीमधील वातावरण बेभरवशाचे आहे. त्यामुळे पाऊस आल्यास क्रिकेट प्रेमींची निराशा होणार आहे.

'खोक्या'चा गेम ओव्हर, स‍तीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर
'खोक्या'चा गेम ओव्हर, स‍तीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर.
'कराड पेक्षा मोठा आका',धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरवर गुन्हा दाखल
'कराड पेक्षा मोठा आका',धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरवर गुन्हा दाखल.
सतीश भोसलेला अखेर बेड्या, पण 'खोक्या' प्रयागराजला पोहोचलाच कसा?
सतीश भोसलेला अखेर बेड्या, पण 'खोक्या' प्रयागराजला पोहोचलाच कसा?.
आईनेच 8 वर्षाच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून फेकलं, इतकंच नाहीतर...
आईनेच 8 वर्षाच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून फेकलं, इतकंच नाहीतर....
'तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही', रवींद्र धंगेकरांना कोणाचा इशारा?
'तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही', रवींद्र धंगेकरांना कोणाचा इशारा?.
मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट
मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट.
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण...
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण....
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्.
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल.
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी.