सर्व कंपन्यांना मागे टाकून IPL स्पॉन्सरसाठी कोणी मारली बाजी, आता पाच वर्षांसाठी देणार 2500 कोटी

IPL Title Sponsor | IPL 2024 ते 2028 चे टायटल हक्क टाटा कंपनीला मिळाले. यापूर्वी आयपीएलचे शीर्षक हक्क टाटा कंपनीकडे होते. आता टाटा कंपनीने 2500 कोटी रुपयांना 5 वर्षांसाठी पुन्हा हक्क मिळवले आहे. बीसीसीआयने टायटल हक्काच्या बोलीच्या स्पर्धेत चीन कंपन्यांना बंदी घातली होती.

सर्व कंपन्यांना मागे टाकून IPL स्पॉन्सरसाठी कोणी मारली बाजी, आता पाच वर्षांसाठी देणार 2500 कोटी
Follow us
| Updated on: Jan 20, 2024 | 11:54 AM

नवी दिल्ली, दि.20 जानेवारी 2024 | इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) स्पॉन्सरशिप पाच वर्षांसाठी पुन्हा विकण्यात आली आहे. टायटल हक्क घेण्याच्या स्पर्धेत दोन कंपन्यांची सारखी बोली लावली. अखेर IPL 2024 ते 2028 चे टायटल हक्क टाटा कंपनीला मिळाले. यापूर्वी आयपीएलचे शीर्षक हक्क टाटा कंपनीकडे होते. आता टाटा कंपनीने 2500 कोटी रुपयांना 5 वर्षांसाठी पुन्हा हक्क मिळवले आहे. म्हणजेच टाटा ग्रुप भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला दरवर्षी शीर्षक प्रायोजकाकडून आता 500 कोटी रुपये देणार आहे. यापूर्वी दोन वर्षांसाठी 670 कोटी रुपये टाटाने दिले होते. आता टाटा आणि आदित्य बिर्ला समूहानेही सारखी 2500 कोटी रुपयांची बोली लावली.

अशी मिळाली टाटाला स्पॉन्सरशिप

12 डिसेंबर रोजी BCCI ने स्पॉन्सरशिपसाठी टेंडर काढले होते. त्यात 14 जानेवारी रोजी आदित्य बिर्ला समूहाने 2500 कोटींची बोली लावली. त्यानंतर बीसीसीआयने टाटा ग्रुप यांच्याकडे विचारणा केली. त्यानंतर शुक्रवार संध्याकाळी टाटा ग्रुपने इतकी बोली लावली. मागील दोन वर्षांपासून टाटा ग्रुप IPL चा स्पॉन्सर आहे. यापूर्वी टाटाने IPL 2022 आणि 2023 मध्ये स्पॉन्सरशिपसाठी बीसीसीआयला 670 कोटी दिले. आता IPL चा क्रेझ वाढत आहे. यामुळे IPL टायटलची किंमत वाढवण्यात आली आहे.

आयपीएल 2024 मध्ये एकूण 74 सामने

IPL 2024 मध्ये एकूण 74 सामने होणार आहेत. त्यानंतर बीसीसीआयकडून IPL 2025 मध्ये 84 तर IPL 2026 मध्ये 94 सामने घेतले जाणार आहे. त्यामुळे आयपीएल शीर्षकाची किमत वाढवली आहे. बीसीसीआयकडून 5 लाख रुपयांचे टेंडर दस्तऐवज काढले होते. ती भरण्याची तारीख 8 जानेवारी होती. यामध्ये बीसीसीआयने चिनी कंपन्या प्रायोजकत्वासाठी बोली लावू शकत नाहीत, असे स्पष्ट केले होते. भारत आणि चीन दरम्यान सीमा प्रश्नावर असलेल्या वादानंतर बीसीसीआयने चिनी कंपन्यांकडून प्रायोजकत्व न घेण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी 2021 मध्ये चिनी टेक कंपनी Vivo आयपीएलची टायटल स्पॉन्सर होती.

हे सुद्धा वाचा

आयपीएलचे सीजन यंदा 21 मार्चपासून सुरु होण्याची शक्यता आहे. ही स्पर्धा 26 जानेवारीपर्यंत चालण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी महिला प्रीमियर लीग होणार आहे. लोकसभा निवडणुकी दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.