KL Rahul: केएल राहुलची जागा घेण्यासाठी महाराष्ट्राचे ‘हे’ दोन प्लेयर तयार, फक्त संधीची प्रतीक्षा

KL Rahul: सध्या खराब फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहुलची जागा कुठले प्लेयर्स भरुन काढू शकतात. कोण आहेत ते? जाणून घ्या त्याबद्दल....

KL Rahul: केएल राहुलची जागा घेण्यासाठी महाराष्ट्राचे 'हे' दोन प्लेयर तयार, फक्त संधीची प्रतीक्षा
KL Rahul Image Credit source: GETTY IMAGES
Follow us
| Updated on: Dec 27, 2022 | 12:52 PM

मुंबई: सध्या टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुलचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत केएल राहुल फ्लॉप ठरला. बांग्लादेश दौऱ्यातही त्याला प्रभावी कामगिरी करता आली नाही. दोन कसोटी सामन्यात त्याने टीम इंडियाच नेतृत्व केलं. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मालिका जिंकली. पण त्याचा व्यक्तीगत परफॉर्मन्स खराब होता. सततच्या खराब प्रदर्शनामुळे त्याला कसोटी आणि टी 20 संघातून डच्चू मिळू शकतो. केएल राहुलची जागा घेण्यासाठी काही खेळाडू दावेदार आहेत. राहुलची जागा घेऊ शकतील, अशा पाच खेळाडूंबद्दल जाणून घ्या.

शुभमन गिल: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट सीरीजसाठी रोहित शर्मा पूर्णपणे फिट होऊन मैदानात पुनरागमन करु शकतो. रोहितसोबत शुभमन गिलची ओपनिंग कॉम्बिनेशन टीमसाठी फायद्याची ठरु शकते. शुभमन गिलने बांग्लादेश दौऱ्यात शतक ठोकलय. सध्या तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. गिल आणि रोहित यांनी याआधी सुद्धा टेस्टमध्ये ओपनिंग केलीय.

संजू सॅमसन: विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनला टीम इंडियात फार संधी मिळालेली नाही. संजू सॅमनस टी 20 मध्ये सलामीवीर म्हणून केएल राहुलला चांगला पर्याय ठरु शकतो. टी 20 च्या चार आंतरराष्ट्रीय सामन्यात संजू सॅमसनने ओपनिंग केलीय. त्याची सरासरी 26.25 आणि 164.06 च्या स्ट्राइक रेटने 105 धावा केल्यात. संजू सॅमसन वनडे क्रिकेटमध्ये मीडल ऑर्डरमध्ये केएल राहुलला पर्याय ठरु शकतो.

इशान किशन: टी 20 मध्ये सलामीसाठी केएल राहुलच्या जागी इशान किशन उत्तम पर्याय आहे. डावखुरा इशान किशन 21 टी 20 सामने खेळलाय. यात त्याने 29.45 च्या सरासरीने 589 धावा केल्या आहेत. इशान किशनने बांग्लादेश दौऱ्यात तिसऱ्या वनडे सामन्यात द्विशतक झळकावलं होतं. यावरुन त्याच्यात टी 20 प्रमाणे वनडे क्रिकेटमध्येही दमदार कामगिरी करण्याची क्षमता दिसून येते. ऋतुराज गायकवाड: महाराष्ट्राचा फलंदाज ऋतुराज गायकवाड देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करतोय. अलीकडेच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने चार शतक झळकावली. यूपी विरुद्धच्या सामन्यात त्याने एका ओव्हरमध्ये सात षटकार लगावले. मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही ऋतुराजने उत्तम प्रदर्शन केलं. ऋतुराज केएल राहुलला चांगला पर्याय ठरु शकतो.

पृथ्वी शॉ: 23 वर्षांचा पृथ्वी शॉ टी 20 आणि टेस्ट क्रिकेटमध्ये केएल राहुलला पर्याय ठरु शकतो. पृथ्वी शॉ टीम इंडियामधून सलामीवीर म्हणून खेळलाय. पृथ्वी शॉ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. यंदाच्या सीजनमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने मुंबईकडून सर्वाधिक धावा केल्या. टी 20 टीमध्ये पृथ्वी शॉ ला संधी मिळू शकते.

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.