भारतीय A संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी सज्ज, BCCI ने जाहीर केला संघ, उम्रान मलिकला संधी

भारतीय A संघ 23 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार असून यासाठी भारतीय संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

भारतीय A संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी सज्ज, BCCI ने जाहीर केला संघ, उम्रान मलिकला संधी
उम्रान मलिक आणि प्रियांक पांचाल
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 11:09 PM

मुंबई: आगामी काही महिन्यात भारतीय संघाच वेळापत्रक अगदी व्यस्त असणार आहे. विविध असे चार देश भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान भारताचा A संघ या महिन्याखेरीस दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा नुकतीच भारतीय क्रिकेट नियामक (BCCI) मंडळाने केली आहे. यावेळी सर्व युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

इंडिया-A संघासाठी 14 खेळाडूंची निवड करण्यात आली आसून गुजरातच्या प्रियांक पांचाल याला कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. तर जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज उम्रान मलिक याला आयपीएलमधील वेगवान गोलंदाजीमुळे या दौऱ्यात संधी मिळाली आहे. उम्रानने आयपीएलमध्ये यंदाच्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू फेकला आहे.

दक्षिण आफ्रीका दौऱ्यासाठी भारतीय A संघ– प्रियांक पांचाल (कर्णधार), पृथ्वी शॉ, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, सरफराज खान, बाबा अपराजित, उपेंद्र यादव (यष्टीरक्षक), कृष्णप्पा गौतम, राहुल चाहर, सौरभ कुमार, नवदीप सैनी, उम्रान मलिक, इशान पोरेल आणि अरजान नावासवाला

कोण आहे प्रियांक पांचाल?

या दौऱ्यात कर्णधारपद सोपवण्यात आलेला प्रियांक पांचाल कोण आहे. याबद्दल अनेकांना माहिती नाही. तर 31 वर्षीय प्रियांक हा मूळचा गुजरातचा असून तो एक उत्कृष्ट फलंदाज आहे. त्याने 98 प्रथम श्रेणी सामन्यात 6 हजार 891 धावा केल्या आहेत. यावेळी त्याने 45.63 च्या सरासरीने 24 शतकं ठोकली आहेत. याशिवाय लिस्ट ए सामन्यात प्रियांकने 40.19 च्या सरासरीने 2 हजार 854 धावाही केल्या आहेत.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दौरा

  • पहिला कसोटी सामना- 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर, ब्लोमफॉन्टेन
  • दुसरा कसोटी सामना- 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर, ब्लोमफॉन्टेन
  • तिसरा कसोटी सामना- 6 डिसेंबर ते 9 डिसेंबर, ब्लोमफॉन्टेन

इतर बातम्या

मोठी बातमी: टी20 संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे, न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ जाहीर

T20 World Cup: ‘हा’ आहे भारत, ‘हे’ आहे भारताचं क्रिकेटबद्दलचं प्रेम, नामिबीयाविरुद्धच्या सामन्या पंतचा ‘तो’ VIDEO व्हायरल

मोठ्या वादात अडकला शोएब अख्तर, अचानक टीव्ही शो सोडणं पडलं महागात, चॅनेलने ठोकला 100 मिलीयनचा दावा

(Team India a squad for the south africa tour announced priyank panchal is captain and umran malik gets chance)

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.