World Cup 2023 | Hardik pandya वर्ल्ड कपमधून OUT झाल्यानंतर त्याची पहिली Reaction
World Cup 2023 | टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आहे. हार्दिक आता उर्वरित वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये खेळू शकणार नाहीय. टीम इंडिया आणि त्यांच्या चाहत्यांना वाटत होतं की, हार्दिक पांड्या सेमीफायनलआधी फिट होईल. पण असं झालं नाही. हार्दिक पांड्याच टीममध्ये नसणं हा संघासाठी एक झटका आहे.
मुंबई : टीम इंडियाच्या तमाम चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. वर्ल्ड कपमध्ये दमदार प्रदर्शन करणाऱ्या टीम इंडियासाठी हा एक मोठा झटका आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या वर्ल्ड कप 2023 मध्ये आता खेळू शकणार नाहीय. वर्ल्ड कपमध्ये गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याचा दुखापत झाली होती. ही बातमी ऐकून भारतीय चाहते निश्चित निराश झाले असतील. हार्दिक आता वर्ल्ड कपमध्ये पुढील सामने खेळू शकणार नाहीय. त्यावर आता त्याची Reaction आली आहे. हार्दिक वर्ल्ड कपमधून बाहेर गेल्यामुळे दु:खी आहे. मी मनाने टीमसोबतच असेन असं हार्दिक पांड्याने म्हटलं आहे. “मी वर्ल्ड कपच्या उर्वरित सामन्यात खेळू शकणार नाही, हे वास्तव पचवणं खूप कठीण आहे. मी मनाने टीमसोबतच राहणार आहे. प्रत्येक चेंडूवर त्यांचा उत्साह वाढवीन. तुमच्या सदिच्छा, प्रेम आणि समर्थनासाठी मनापासून आभार. हे अविश्वसनीय आहे. ही टीम विशेष आहे. प्रत्येकाला अभिमान वाटेल अशी कामगिरी आपण करु हा मला विश्वास आहे” असं हार्दिक पांड्याने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलय.
बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात खेळताना हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो न्यूझीलंड, श्रीलंका आणि इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही. हार्दिक पांड्या 2-3 सामन्यात खेळणार नाही, असं वाटलं होतं. पण त्याची दुखापत गंभीर होती. त्याच्याजागी सूर्यकुमार यादवचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. सूर्यकुमार इंग्लंड विरुद्ध 49 धावांची इनिंग खेळला. श्रीलंकेविरुद्ध तो चालला नाही. हार्दिकच बाहेर होण टीम इंडियासाठी झटका आहे. कारण टीमला हार्दिकच्या जागी दोन खेळाडूंचा समावेश करावा लागतो. हार्दिक पांड्या सहाव्या नंबरवर फलंदाजीसाठी यायचा. कॅप्टनला त्याच्यामुळे सहाव्या गोलंदाजाचा पर्याय मिळायचा.
View this post on Instagram
हार्दिक न खेळूनही टीम इंडिया सरस
हार्दिक पांड्या दुखापतीमुळे काही सामने खेळू शकला नाही, त्यावेळी सुद्धा टीम इंडियाच्या कामगिरीवर काही परिणाम झाला नाही. टुर्नामेंट टीम इंडिया आतापर्यंत 7 सामने खेळली आहे. सर्व सामन्यात विजय मिळवलाय. त्यांचे 14 पॉइंट्स आहेत. गुण तालिकेत टीम इंडिया पहिल्या स्थानानवर आहे. टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.