SRH vs RCB IPL 2023 : RCB विरुद्ध मॅच हरल्यानंतर ‘या’ भारतीय प्लेयरच करियरही संपल का?
SRH vs RCB IPL 2023 : टीम इंडियाच्या एका स्टार क्रिकेटपटूच करियरही संपल्यात जमा आहे. कारण आय़पीएलच्या चालू सीजनमध्ये त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. तो आपला प्रभाव पाडू शकला नाही.
हैदराबाद : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या टीमने गुरुवारी सनरायजर्स हैदराबादच्या टीमला 8 विकेट्सने धूळ चारली. आयपीएल 2023 मधील हा सामना RCB साठी खूप महत्वाचा होता. कारण या विजयावर त्यांच्या प्लेऑफच्या आशा टिकून होत्या. RCB ने हा सामना जिंकलाच. पण त्याचवेळी भारताच्या एका स्टार क्रिकेटपटूच करियर जवळपास संपल्यात जमा आहे. भारतीय क्रिकेट टीममध्ये या खेळाडूला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता धुसर आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर आता आयपीएलमध्ये हा खेळाडू आपल्या टीमसाठी काही विशेष करु शकला नाही. त्याची कामगिरी फ्लॉप होती. मागच्या काही महिन्यात त्याच्या खेळात घसरण झाली. सुधारणा अजिबात दिसली नाही.
कोण आहे तो टीम इंडियाचा प्लेयर?
SRH चा काल RCB ने दारुण पराभव केला. या पराभवाला हा भारतीय खेळाडू जबाबदार आहे. टीम इंडियातून या प्लेयरला ड्रॉप करण्यात आलं. BCCI च्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधूनही हा प्लेयर बाहेर गेलाय. भारताच्या या फ्लॉप प्लेयरच नाव भुवनेश्वर कुमार आहे. कालच्या मॅचमध्ये भुवनेश्वर SRH साठी मोठा विलन ठरला. त्याने 4 ओव्हरमध्ये 48 धावा देताना फक्त 1 विकेट काढला.
अन्य भारतीय बॉलर्सची कामगिरी कशी?
भुवनेश्वर कुमारचा इकॉनमी रेट 12.00 चा होता. भुवनेश्वर कुमार IPL 2023 च्या सीजनमध्ये 13 सामन्यात फक्त 15 विकेट घेतलेत. या दरम्यान त्याने 399 धावा दिल्या. भुवनेश्वर कुमारला चांगली कामगिरी करता आली नाही. दुसऱ्याबाजूला अन्य भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीवर नजर टाकूया. मोहम्मद शमीने आयपीएल 2023 मध्ये 23 विकेट घेतल्यात. पर्पल कॅप शमीकडे आहे. मोहम्मद सिराजने सुद्धा 13 सामन्यात 17 विकेट घेतलेत. दोघांनी भुवनेश्वर सारख्या जास्त धावा दिलेल्या नाहीत. सिलेक्टर्स दुर्लक्ष करणार, कारण….
मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज दोघेही आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी शानदार प्रदर्शन करतायत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसह आगामी वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी टीम इंडियाची पहिली पसंत असेल. सिलेक्टर्स भुवनेश्वर कुमारकडे दुर्लक्ष करतील, कारण त्याचा परफॉर्मन्स नाहीय.