World Cup 2023 : टीम इंडिया जिंकू शकते 2023 वनडे वर्ल्ड कप, फक्त ‘या’ दोन टीम्सकडून स्वप्न भंगाचा धोका
World Cup 2023 : यंदा भारत भूमीवर वनडे वर्ल्ड कप रंगणार आहे. 5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होईल. 19 नोव्हेंबरला वर्ल्ड कपची फायनल होईल. टीम इंडियाला वर्ल्ड कप विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जातय.
मुंबई : यंदा भारताच्या भूमीवर वनडे वर्ल्ड कप 2023 ची स्पर्धा रंगणार आहे. 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होईल. 19 नोव्हेंबरला वनडे वर्ल्ड कपची फायनल होईल. टीम इंडियाला यंदा वर्ल्ड कप विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल जातय. पण 2 अशा टीम्स आहेत, ज्या टीम इंडियाच वनडे वर्ल्ड कप विजयाच स्वप्न मोडू शकतात. मागच्या 10 वर्षापासून टीम इंडियाला आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाहीय. भारतात होणारी वनडे वर्ल्ड कप स्पर्धा एक चांगली संधी आहे.
टीम इंडियाला मायदेशात वर्ल्ड कप खेळण्याचा नक्कीच फायदा मिळेल. कारण इथल्या खेळपट्ट्या आणि हवामानाचा इतर टीम्सपेक्षा भारतीय संघाला जास्त फायदा होणार आहे.
मागच्या वर्ल्ड कपची पुनरावृत्ती नको
फक्त दोन टीम्सकडून भारताच्या वनडे वर्ल्ड कप विजयाच्या स्वपनाला सुरुंग लागू शकतो. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या त्या दोन धोकादायक टीम आहेत. ऑस्ट्रेलियाने 5 वेळा वनडे वर्ल्ड कप जिंकला आहे. इंग्लंड 2023 मधील वर्ल्ड कप विजेता म्हणून मैदानात उतरेल. इंग्लंडमध्ये 2019 ला वनडे वर्ल्ड कप टुर्नामेंट झाली होती. त्यावेळी सेमीफायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. आता 2023 वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन टीम्सकडून धोका आहे.
कुठल्या दोन टीम्सकडून धोका?
इंग्लंडपासून जास्त धोका का ? ते समजून घ्या. इंग्लंडच्या टीममध्ये टॉप ऑर्डरपासून लोअर ऑर्डरपर्यंत धोकादायक खेळाडू आहेत. हॅरी ब्रूक, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स आणि जोस बटलर य़ांच्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजीला अधिक मजबुती मिळते. त्यांच्याकडे चांगले गोलंदाज सुद्धा आहेत. त्यामुळे टीम इंडियाला वर्ल्ड कप 2023 मध्ये इंग्लंडपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. गोलंदाजीत इंग्लंडकडे मार्क वुड, क्रिस वोक्स, सॅम कुरेन, बेन स्टोक्स, मोईन अली आणि आदिल राशिदसारखे घातक क्रिकेटर्स आहेत. या टीमकडे भारतात खेळण्याचा जास्त अनुभव
ऑस्ट्रेलियाने 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 असं पाचवेळा वनडे वर्ल्ड कप जिंकला आहे. वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियापासून भारताला धोका असेल. ऑस्ट्रेलियाच्या बऱ्याच खेळाडूंना भारतात क्रिकेट खेळण्याचा मोठा अनुभव आहे. ऑस्ट्रेलियाकडे डेविड वॉर्नर, मॅथ्यू वेड, स्टीव स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिन्ससारखे घातक खेळाडू आहेत.