Rohit Sharna | न्यूझीलंड विरुद्ध कमकुवत बाजू उघड, रोहितकडे सूर्यकुमारच्या जागी हे आहेत दोन चांगले ऑप्शन

IND vs AUS WC Final 2023 | न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाने सेमीफायनलचा सामना 70 धावांनी जिंकला. पण या सामन्यात टीम इंडियाची एक कमकुवत बाजू उघड झाली. याचा फायदा ऑस्ट्रेलिया सारखा संघ उचलू शकतो. त्यामुळे रोहित शर्माकडे अजूनही दोन पर्याय आहेत.

Rohit Sharna | न्यूझीलंड विरुद्ध कमकुवत बाजू उघड, रोहितकडे सूर्यकुमारच्या जागी हे आहेत दोन चांगले ऑप्शन
कॅप्टन रोहित शर्मा याने फिल्डिंगचा सराव केला. रोहितने प्रॅक्टीस सेशलमध्ये स्लिपमध्ये कॅच घेण्याचा सराव केला.
Follow us
| Updated on: Nov 18, 2023 | 12:33 PM

IND vs AUS WC Final 2023 | टीम इंडिया आता वर्ल्ड कपच्या एकदम निर्णायक टप्प्यावर आहे. फक्त एक विजय आणि वर्ल्ड कप आपला. टीम इंडियाचा या वर्ल्ड कपमधील प्रवास एका अजिंक्य योद्धयासारखा राहिला आहे, अगदी पहिल्या सामन्यापासून टीम इंडियाने मैदानावर वर्चस्व गाजवलय. कुठल्याही टीमला डोक वर काढण्याची संधी दिलेली नाही. आता उद्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध रंगणाऱ्या अंतिम सामन्यातही टीम इंडियाकडून हीच अपेक्षा असेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनलचा सामना खेळला जाणार आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या आतापर्यंतच्या प्रवासात एखाद-दुसरे बदल केले आहेत. विजेत्या प्लेइंग इलेव्हनवर विश्वास कायम ठेवलाय. हार्दिक पांड्या टीममधून बाहेर गेल्यानंतर दोन बदल झाले, जे अजूनपर्यंत कायम आहेत. सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमीची टीममध्ये एन्ट्री झाली. मोहम्मद शमीचा बदल टीम इंडियाला खूपच फायद्याचा ठरला.

मोहम्मद शमीने आपल्या आग ओकणाऱ्या गोलंदाजीने प्रतिस्पर्धी टीमला घायाळ करुन सोडलं. एकापाठोपाठ एक सामन्यात मोहम्मद शमीने विकेटचा धडाका लावला. आज शमीची गोलंदाजी खेळण कुठल्याही टीमसाठी सोपं नाहीय. सेमीफायनल सारख्या महत्त्वाच्या सामन्यात शमीने एकट्याने न्यूझीलंडचे सात विकेट काढले. ते सुद्धा फलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर. त्यामुळे मोहम्मद शमीला संघात स्थान देण्याचा निर्णय फायद्याचा ठरला. पण सूर्यकुमार यादवला स्थान देण्याच्या निर्णयाचा तुलनेने फायदा झालेला दिसत नाही. एखाद-दुसरा अपवाद वगळत सूर्यकुमार यादवला छाप उमटवणारी कामगिरी करता आलेली नाही. सूर्यकुमार यादव लोअर ऑर्डरमध्ये बॅटिंगला येतो. फार सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी खालच्या क्रमांकापर्यंत आलेली नाही. हाणामारीच्या षटकात सूर्यकुमारला फलंदाजीची संधी मिळालीय.

रोहितसमोरचे दोन ऑप्शन कुठले?

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची एक कमकुवत बाजू उघड झाली होती. टीम इंडियाकडे पाचच गोलंदाज आहेत. सहाव्या बॉलरचा पर्याय नाहीय. 2011 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर असे पर्याय होते. तसं आता नाहीय. रोहित शर्माला फक्त पाच गोलंदाजांवर अवलंबून राहण भाग आहे. डॅरिल मिचेल आणि केन विलियमसनची जोडी फोडताना नाकीनऊ आले होते. कारण सहाव्या बॉलरचा पर्याय नव्हता. तेच आता फायनलमध्ये सूर्यकुमारच्या जागी अश्विनचा आणि शार्दुल ठाकूर हे दोन पर्याय आहेत. कारण दोघेही गोलंदाजीबरोबर फलंदाजी करु शकतात. अश्विन जास्त आश्वासक पर्याय आहे. कारण ऑस्ट्रेलिया विरुद्ध चालू वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात तो खेळला होता. त्याची गोलंदाजी खेळण ऑस्ट्रेलियन टीमला नेहमीच जड गेलय. त्यामुळे रविचंद्रन अश्विन उत्तम पर्याय ठरु शकतो.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.