Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma : ‘रोहितने खेळू नये, तो बेशुद्ध पडेल’, मोठ्या भारतीय खेळाडूच संतापजनक वक्तव्य

Rohit Sharma : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप जिंकला. वर्ल्ड कप 2024 मध्ये टीमने दमदार प्रदर्शन केलं. पण, तरीही भारतीय क्रिकेटमधील एका मोठा खेळाडू सतत रोहित शर्माच्या विरोधात वक्तव्य करत आहे. महत्त्वाच म्हणजे याच व्यक्तीचा 2011 वनडे वर्ल्ड कपच्या टीममधुन रोहितला ड्रॉप करण्यात रोल होता. त्यावर्षी सुद्धा भारताने वनडे वर्ल्ड कप जिंकला होता.

Rohit Sharma : 'रोहितने खेळू नये, तो बेशुद्ध पडेल', मोठ्या भारतीय खेळाडूच संतापजनक वक्तव्य
Rohit Sharma Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jul 24, 2024 | 3:03 PM

टीम इंडियाचे नवनियुक्त हेड कोच गौतम गंभीर यांनी अलीकडेच रोहित शर्मा आणि विराट कोहली बद्दल सकारात्मक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांचे चाहते खुश झाले होते. रोहित आणि विराटला हवं असेल तो पर्यंत ते वनडे क्रिकेट खेळू शकतात, असं गौतम गंभीर म्हणाले होते. दोघेही फिट राहिले, तर ते वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये खेळताना दिसतील असं गंभीर म्हणाले होते. गौतम गंभीरच्या या वक्तव्याशी भारताचे माजी क्रिकेटपटू कृष्णम्माचारी श्रीकांत अजिबात सहमत नाहीयत. श्रीकांतने एका यूट्यूब लाइवमध्ये रोहित शर्माच्या फिटनेसबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं. रोहितने 2027 चा वर्ल्ड कप खेळू नये, असं श्रीकांत म्हणाले.

श्रीकांत यांनी त्यांचा मुलगा अनिरुद्ध बरोबर चर्चा करताना रोहित शर्मावर हल्लाबोल केला. “विराट कोहली एक चॅम्पियन खेळाडू आहे, रोहित शर्माने 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळू नये. दक्षिण आफ्रिकेत तो बेशुद्ध पडेल” श्रीकांत यांनी असं धक्कादायक वक्तव्य रोहित बद्दल केलं. श्रीकांत यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालय. रोहितचे फॅन्स श्रीकांत यांना ट्रोल करतायत. श्रीकांत यांनी रोहित शर्मावर निशाणा साधण्याची ही पहिली वेळ नाहीय. आयपीएल 2024 मध्येही श्रीकांत यांनी रोहितवर टीका केलेली. रोहित शर्माने नाव बदलून नो हिट शर्मा ठेवावं, असं श्रीकांत म्हणाले होते.

रोहित शर्माच्या विरोधात बोलत असतात

त्यावेळी रोहित शर्मा खराब फॉर्ममध्ये होता, म्हणून श्रीकांत यांनी अशी टीका केलेली. रोहित शर्माने T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये जबरदस्त प्रदर्शन करुन सर्वांची तोंड बंद केली. 2011 मध्ये टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कप जिंकला, त्यावेळी श्रीकांतच टीमचे चीफ सिलेक्टर होते. श्रीकांत यांनी रोहित शर्माची वनडे वर्ल्ड कपसाठी टीममध्ये निवड केली नव्हती. त्याच्याजागी युसूफ पठाणला संधी मिळालेली. श्रीकांत सतत रोहित शर्माच्या विरोधात बोलत असतात. महत्त्वाच म्हणजे, रोहित आपल्या परफॉर्मन्सने त्यांना चुकीच सिद्ध करतो.

जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे.
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार.
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय.
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट.
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद.
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र.
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?.
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका.
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी.
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय...
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय....