WI vs IND 1st ODI | विजयाचा हिरो कुलदीप यादव, पण कॅप्टन रोहित शर्माकडून दुसऱ्याच खेळाडूच कौतुक
WI vs IND 1st ODI | रोहित शर्मा मनातल बोलला. जिंकलो, पण प्रयोग फसला, कॅप्टन रोहित शर्मा सामन्यानंतर काय म्हणााला?. टीम इंडियाने या सामन्यात केलेले प्रयोग सपशेल फसले.
नवी दिल्ली : टेस्ट सीरीजनंतर आता वनडे मालिका सुरु झाली आहे. काल टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमध्ये पहिला वनडे सामना झाला. या मॅचमध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर आरामात विजय मिळवला. पण टीम इंडियाच्या विजयात ती शान, दिमाखदारपणा नव्हता. टीम इंडियाने पहिली गोलंदाजी केली. भेदक बॉलिंगच्या बळावर टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा डाव 23 ओव्हरमध्ये 114 धावात आटोपला. टीम इंडियाने 22.5 ओव्हर्समध्ये विजयी लक्ष्य गाठलं.
विजयासाठी समोर सोपं लक्ष्य असूनही टीम इंडियाची चांगलीच दमछाक झाली. टीम इंडियाने तब्बल 5 विकेट गमावले. टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने या सामन्यात अनेक प्रयोग केले. पण ते सर्व प्रयोग फसले.
स्पिनर्सचा दबदबा
केनसिंगटन ओवलची खेळपट्टी इतकी खराब होईल, याची रोहित शर्माला कल्पना नव्हती. रोहित शर्मा स्वत: खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता. विराट कोहलीला बॅटिंगची संधीच मिळाली नाही. रोहितने आपल्या या निर्णयाच समर्थन केलं. या मॅचमध्ये स्पिनर्सचा दबदबा दिसून आला. त्यांनी 15 पैकी 10 विकेट घेतले. स्पिनला अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर चेंडू उसळी सुद्धा घेत होता.
खेळपट्टी टर्न झाली
रोहित सामना संपल्यानंतर पुरस्कार वितरण सोहळ्याच्यावेळी म्हणाला की, “खेळपट्टी अशा प्रकारने टर्न होईल, याचा मी कधी विचार केला नव्हता. टीमच्या गरजेनुसार, पहिली गोलंदाजी केली. पीचवर वेगवान गोलंदाज आणि स्पिनर्ससाठी सर्वकाही होतं. आमच्या खेळाडूंनी त्यांना कमीत कमी धावसंख्येवर रोखून चांगलं प्रदर्शन केलं”
For his brilliant bowling performance to set up India’s win, Kuldeep Yadav bags the Player of the Match award in the first ODI ? ?#TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/PpcenB75Lw
— BCCI (@BCCI) July 27, 2023
7 व्या नंबरवर बॅटिंग करण्याच्या निर्णयाबद्दल रोहित काय म्हणाला?
“सातव्या नंबरवर बॅटिंग करताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मी टीममध्ये नवीन असताना, या नंबरवर बॅटिंग करायचो” असं रोहित शर्माने सांगितलं. “मी भारतासाठी डेब्यु केला, तेव्हा सातव्या नंबरवर बॅटिंग करायचो. मला त्या दिवसांची आठवण आली” असं रोहित म्हणाला. “वनडेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना खेळण्यासाठी वेळ द्यायचा आहे. शक्य असेल, तेव्हा आम्ही प्रयोग करत राहू. वेस्ट इंडिजला 115 धावांवर रोखल्यानंतर आम्ही खेळाडूंची चाचपणी करु शकतो, त्यांना संधी देऊ शकतो, हे ठाऊक होतं” असं रोहित म्हणाला. कुलदीपच नाही, ‘या’ खेळाडूच कौतुक
सूर्यकुमार यादवला तिसऱ्या आणि हार्दिक पांड्याला चौथ्या नंबरबवर फलंदाजीसाठी पाठवण्याच्या निर्णयाच रोहितने समर्थन केलं. रोहितने नवोदीत वेगवान गोलंदाज मुकेश कुमारच कौतुक केलं. मुकेश कुमारने पहिली टेस्ट मॅच खेळतानाच सर्वांना प्रभावित केलं होतं. “मुकेश शानदार गोलंदाज आहे. तो चेंडूला चांगल्या गतीने स्विंग करु शकतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याला जास्त पाहिलेलं नाही. आमच्या गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन केलं. त्यानंतर इशानने चांगली बॅटिंग केली” असं रोहित म्हणाला. खरा कुलदीप यादव टीम इंडियाच्या विजयाचा हिरो आहे. त्याने 6 धावा देऊन 4 विकेट काढल्या.