Ajinkya Rahane : टीम इंडियात चान्स नाही, अजिंक्य रहाणे आता ‘या’ परदेशी टीमसाठी खेळणार
Ajinkya Rahane : खराब फॉर्ममुळे त्याला संघातील स्थान गमवाव लागलं. अजिंक्य रहाणेला लगेच टीममधून काढलं नाही. त्याचा अनुभव लक्षात घेऊन, त्याला बऱ्याच संधी दिल्या.
मुंबई : खराब फॉर्ममुळे अजिंक्य रहाणेला टीम इंडियातील आपलं स्थान गमवाव लागलं. एकवेळ अजिंक्य रहाणे टीम इंडियाचा उपकर्णधार होता. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत त्याने टीम इंडियाच नेतृत्व सुद्ध केला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली, त्यावेळी अजिंक्य रहाणेकडे नेतृत्वाची धुरा होती. मागच्यावर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरीजमधील खराब फॉर्ममुळे त्याला संघातील स्थान गमवाव लागलं. अजिंक्य रहाणेला लगेच टीममधून काढलं नाही. त्याचा अनुभव लक्षात घेऊन, त्याला बऱ्याच संधी दिल्या. पण अपेक्षित कामगिरी होत नसल्याने अखेर त्याला टेस्ट टीममधून ड्रॉप केलं.
टीम इंडियाचे दरवाजे उघडण्याची शक्यता कमी
अजिंक्य रहाणे त्यानंतर आयपीएल आणि अन्य देशांतर्गत क्रिकेट टुर्नामेंटमध्ये खेळला. मुंबईच नेतृत्व सुद्धा त्याने केलं. पण अजूनही त्याला टीम इंडियात स्थान मिळालेलं नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याला छाप उमटवणारी कामगिरी करता आलेली नाही. सध्यातरी त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडण्याची शक्यता कमी आहे.
कुठल्या परदेशी टीमकडून रहाणे खेळणार?
त्यामुळे अजिंक्य रहाणेने एक मोठा निर्णय घेतलाय. अजिंक्यने इंग्लंडची काऊंटी टीम लीस्टरशायरशी करार केला आहे. रहाणे यावर्षी होणाऱ्या काऊंटी चॅम्पियनशिप आणि वनडे कपमध्ये लीस्टरशायरकडून खेळणार आहे. लीस्टरशायरने सोशल मीडियावरुन अजिंक्य रहाणे त्यांच्याकडून खेळणार असल्याची माहिती दिलीय. ‘रहाणेच्या अनुभवाचा लीस्टरशायरला फायदा होईल’ असं लीस्टरशायरचे क्रिकेट डायरेक्टर क्लॉड हेंडरसन म्हणाले. टीम इंडियाकडून शेवटचा कधी खेळला?
लीस्टरशायरकडून खेळण्याची संधी मिळणार असल्याने अजिंक्य रहाणेने सुद्धा आनंद व्यक्त केलाय. लीस्टरशायरमधील नवीन सहकाऱ्यांना भेटण्यासाठी तो उत्सुक आहे. अजिंक्य रहाणेने चालू रणजी ट्रॉफी स्पर्धेत 7 सामन्यात 57.63 च्या सरासरीने 634 धावा ठोकल्या आहेत. रहाणेने 2 सेंच्युरी आणि एक हाफ सेंच्युरी झळकवली आहे. अजिंक्य रहाणे टीम इंडियाच्या टेस्ट टीममधून बाहेर होऊन एक वर्ष झालय. मागच्यावर्षी जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो शेवटचा कसोटी सामना खेळला होता.