IPL 2023 : आधीच टीम इंडियातून बाहेर, आता ‘या’ प्लेयरच आयपीएलमधील करियरही धोक्यात

IPL 2023 : टीम इंडियाच्या एका खेळाडूचा आयपीएलमधूनही पत्ता लवकरच कट होऊ शकतो. एका सीजनसाठी या प्लेयरला 5.50 कोटी रुपये मिळतात. त्याला त्याच्या लौकीकाला साजेसा खेळ दाखवता येत नाहीय. त्याचं करियर धोक्यात आहे.

IPL 2023 : आधीच टीम इंडियातून बाहेर, आता 'या' प्लेयरच आयपीएलमधील करियरही धोक्यात
Team india
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 1:40 PM

बंगळुरु : टीम इंडियाच्या एका खेळाडूच्या करियरवर टांगती तलवार आहे. आयपीएल 2023 च्या सीजनसोबत या खेळाडूच करियरही संपू शकतं. आयपीएल 2023 मध्ये हा खेळाडू पूर्णपणे फ्लॉप ठरलाय. खराब खेळामुळेच त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद झालेत. आता या खेळाडूच आयपीएल करियरही संकटात आहे. आयपीएल 2023 मध्ये या खेळाडूला सातत्याने संधी मिळतेय. पण प्रत्येक सामन्यात हा प्लेयर टीमचा विश्वास गमावतोय.

मागच्या सीजनमध्ये हा खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत होता. पण आता मात्र चित्र बदललय. त्याला टीममध्ये आपलं स्थान टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय.

कोण आहे हा प्लेयर?

IPL 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून खेळणारा विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक सातत्याने फ्लॉप होतोय. दिनेश कार्तिक मागच्या बऱ्याच काळापासून भारतीय टीमच्या बाहेर आहे. आता दिनेश कार्तिकच्या आयपीएल करियरवरही टांगती तलवार आहे.

8 सामन्यात फक्त इतक्या धावा

दिनेश कार्तिक या सीजनमध्ये आतापर्यंत 8 सामने खेळलाय. त्यात दिनेशने 11.86 च्या सरासरीने फक्त 83 धावा केल्या आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसात दिनेश कार्तिकला टीममधील आपल स्थान गमवाव लागू शकतं.

एका सीजनसाठी किती कोटी घेतो?

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून एका सीजनसाठी खेळण्याचे दिनेश कार्तिक 5.50 कोटी रुपये घेतो. आयपीएल 2023 च्या सीजनमध्ये त्याच्या फ्लॉप शो मुळे RCB च्या अडचणी वाढल्या आहेत. आतापर्यंत तो एकही मोठी इनिंग खेळू शकलेला नाहीय. बुधवारी कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध आरसीबीचा सामना झाला. त्यात त्याने 18 चेंडूत फक्त 22 धावा केल्या. खरंतर संकट काळात टीमला त्याच्याकडून मोठया इनिंगची अपेक्षा होती. टीम इंडियाचे दरवाजे जवळपास बंद

RCB ची टीम KKR विरुद्ध मॅच फक्त 21 रन्सनी हरली. दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 237 सामने खेळलेत. दिनेशने 26.23 च्या सरासरीने 4459 धावा केल्या आहेत. त्याने 20 हाफ सेंच्युरी झळकवल्या आहेत. दिनेश कार्तिकसाठी टीम इंडियाचे दरवाजे जवळपास बंद झालेत. दिनेश कार्तिक नोव्हेंबर 2022 मध्ये टीम इंडियाकडून अखेरचा सामना खेळला होता.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.