Prithvi Shaw Controversy : सपना गिल प्रकरणात पृथ्वी शॉ बद्दल पोलिसांच कोर्टात महत्वाच स्टेटमेंट
Prithvi Shaw Controversy : सपना गिलने पृथ्वी शॉ विरोधात विविध कलमांतर्गत तक्रार नोंदवली होती. गिलने पृथ्वी शॉ वर कलम 354, कलम 509 आणि कलम 324 अंतर्गत तक्रार नोंदवली होती.
मुंबई : टीम इंडियाचा क्रिकेटर पृथ्वी शॉ सध्या टीमच्या बाहेर आहे. पृथ्वी शॉ क्रिकेटपेक्षा इतर गोष्टींसाठी जास्त चर्चेत असतो. IPL 2023 च्या सीजनमध्ये सुद्धा त्याने विशेष प्रदर्शन केलं नाही. आयपीएलच्या काही दिवस आधी मुंबईच्या हॉटेलबाहेर मॉडेल आणि सोशल मीडिया इंफ्ल्यूएंसर बरोबर झालेल्या वादामुळे तो चर्चेत आला होता. सपना गिलने पृथ्वी शॉ वर गंभीर आरोप केले होते. आता या प्रकरणात एक महत्वाची अपडेट आहे.
मुंबई पोलिसांनी या प्रकरणात सोमवारी अंधरी कोर्टात मजिस्ट्रेटसमोर आपलं स्टेटमेंट दिलं. पोलिसांच्या भूमिकेमुळे पृथ्वी शॉ ला दिलासा मिळाला आहे.
मुंबई पोलिसांनी कोर्टात काय सांगितलं?
मॉडेल सपना गिलने पृथ्वी शॉ वर छेडछाडीचा आरोप केला होता. यावर्षी 15 फेब्रुवारीला मुंबईत एका पब बाहेर हा सर्व राडा झाला होता. मुंबई पोलिसांनी कोर्टाला जी माहिती दिलीय, त्यामध्ये पृथ्वीवरील आरोप खोटे आणि आधारहीन असल्याच म्हटलं आहे. सपना गिलच्या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांनी पृथ्वी शॉ विरोधात FIR नोंदवला नाही. त्यानंतर तिने अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टात धाव घेतली.
सपनाचे वकील अली काशिफ खान यांनी अंधेरी कोर्टात FIR रजिस्टर करण्याची मागणी केली. त्यानंतर मॅजिस्ट्रेटने पोलिसांना या संपूर्ण प्रकरणात रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले होते.
पोलिसांनी कशाच्या आधारावर स्टेटमेंट दिलं
पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारावर कोर्टात स्टेटमेंट केलय. घटनास्थळावर जे साक्षीदार होते, त्यापैकी एकानेही पृथ्वी शॉ ला सपना गिलची छेडछाड करताना पाहिलं नाही. विटनेसमध्ये एक CISF चा स्टाफ सुद्धा होता. सपना गिलच क्रिकेटरसोबत चुकीच वर्तन करत होती, असं प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने सांगितलं.
Kalesh B/w Prithvi Shaw And Influencer Sapna Gill on Roadpic.twitter.com/QI88XpqHuX
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 16, 2023
कोर्टाने काय म्हटलय?
पोलिसांच्या रिपोर्ट्नंतर सपना गिलच्या वकीलाने कोर्टाकडे ते फुटेज दाखवण्याची विनंती केली. त्यात संपूर्ण घटना आहे. सपनाच्या गिलच्या मित्रानेही फोन रेकॉर्डिंग केलं होतं. तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. कोर्टाने आता पोलिसांकडे सर्व घटनाक्रमांचा व्हिडिओ मागितला आहे. हा आदेश देताना 28 जूनपर्यंत प्रकरण स्थगित केलं आहे. म्हणजे आता पुढील सुनावणी 28 जूनला होईल. पृथ्वी शॉ विरोधात कुठली कलमं होती?
सपना गिलने पृथ्वी शॉ विरोधात विविध कलमांतर्गत तक्रार नोंदवली होती. गिलने पृथ्वी शॉ वर कलम 354, कलम 509 आणि कलम 324 अंतर्गत तक्रार नोंदवली होती. गिलने नोंदवलेल्या तक्रारीत पृथ्वी शॉ शिवाय त्याचा मित्र आशिष यादवच सुद्धा नाव आहे. आशिष यादवने बॅटने मारलं, असं सपना गिलचा आरोप होता.