Rishabh Pant Update : ऋषभच दुसर ऑपरेशन होणार होतं, पण….पंतच्या प्रकृतीबद्दल महत्वाची अपडेट

Rishabh Pant Update : मागच्यावर्षी 30 डिसेंबरला ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला होता. तो दिल्लीहून डेहराडूनला आपल्या घरी चालला होता. त्यावेळी त्याची कार अपघातात पलटी झाली. कसाबसा ऋषभ कारच्या बाहेर पडला. त्यानंतर कारने पेट घेतला.

Rishabh Pant Update : ऋषभच दुसर ऑपरेशन होणार होतं, पण....पंतच्या प्रकृतीबद्दल महत्वाची अपडेट
Rishabh PantImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 3:02 PM

नवी दिल्ली : Rishabh Pant बाबत अनेक महिन्यानंतर एक चांगली बातमी आलीय. मागच्यावर्षी 30 डिसेंबरला ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला होता. मुंबईमधील रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. याच अपघातामुळे ऋषभ पंत यावर्षी IPL 2023 मध्ये खेळू शकला नाही. आता ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत एक चांगली अपडेट आहे, ऋषभ पंत लवकरच टीम इंडियात पुनरागमन करु शकतो.

ऋषभ पंतवर दुसरी शस्त्रक्रिया होणार होती. पण आता ही शस्त्रक्रिया होणार नाहीय. TOI च्या वृत्तानुसार, मेडिकल टीम ऋषभ पंतच्या रिकव्हरीवर नजर ठेऊन आहे.

रिकव्हरीची स्थिती काय?

मागच्या 4 महिन्यात ऋषभ पंतने ज्या पद्धतीची रिकव्हरी केलीय, त्यावर डॉक्टर्सची टीम खूपच खूश आहे. अपघातानंतर ऋषभ पंतच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचं दुसरं ऑपरेशन सुद्धा होणार होतं. पण आता ही शस्त्रक्रिया होणार नाहीय.

दर किती दिवसांनी ऋषभच्या दुखापतीची पाहणी होते?

ऋषभ पंतच्या रिकव्हरी प्रोसेसवर लक्ष ठेऊन असलेल्या मेडीकला टीमला असं वाटत की, त्याच्यावर आता दुसऱ्या ऑपरेशनची गरज नाहीय. बाकी इंजरी आपोआप बरी होईल. डॉक्टर दर 15 दिवसानंतर एकदा त्याच्या दुखापतीचा आढावा घेतात.

बीसीसीआय सूत्रांनी काय सांगितलं?

ऋषभची रिकव्हरी अपेक्षेपेक्षा पण खूप चांगली झालीय, असं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं. त्याचं मनोधैर्य यामुळे वाढेल. अशीच रिकव्हरची प्रोसेस सुरु राहिली, तर तो वेळेआधी टीम इंडियात पुनरागमन करु शकतो.

ऋषभ पंत आता कुठे आहे?

दिल्लीमध्ये आपल्या घरी काही दिवस राहिल्यानंतर ऋषभ पंत आता NCA मध्ये आहे. सूत्रांनी सांगितलं की, त्याचा जोश हाय आहे. तो कुबड्या घेतल्याशिवाय बराच लांबपर्यंत चालू शकतो. लवकरच तुम्हाला तो ट्रेनिंग करताना दिसेल. वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळणार?

कार अपघातानंतर ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहे. संपूर्ण वर्ष तो क्रिकेटपासून लांब राहिल असं आधी बोललं जात होतं. आयपीएल, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये तो खेळणार नाहीय. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्येही त्याच्या खेळण्याची शक्यता कमीच आहे.

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.