IPL 2023 आधी Sanju Samson बरोबर न्याय झाला, रात्री उशिरा मिळाली खुशखबरी

भारतीय टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या संजू सॅमसनला मोठा दिलासा. संजू सॅमसनवर वारंवार अन्याय होतो, अशी त्याच्या पाठिराख्यांची भावना आहे. कारण टॅलेंट असूनही संजूला संधी मिळत नाही.

IPL 2023 आधी Sanju Samson बरोबर न्याय झाला, रात्री उशिरा मिळाली खुशखबरी
Sanju samsonImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Mar 27, 2023 | 11:07 AM

BCCI Annual Contract : IPL 2023 सुरु व्हायला चार दिवस शिल्लक आहेत. संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सच नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे. सॅमसनच्या नेतृत्वाखाली मागच्या सीजनमध्ये राजस्थानची टीम फायनलमध्ये पोहोचली होती. यावेळी किताब जिंकण्याचा राजस्थान टीमचा प्रयत्न असेल. टुर्नामेंट सुरु होण्याआधी संजू सॅमसन बरोबर अखेर न्याय झाला आहे. बीसीसीआयने 2022-2023 सीजनसाठी कॉन्ट्रॅक्टची घोषणा केली आहे. यात सॅमसनचा प्रवेश झालाय.

सॅमसनने 2015 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यु केला. पण सॅमसन भारतासाठी अजूनपर्यंत फक्त 11 वनडे आणि 17 टी 20 सामने खेळलाय. टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी त्याला नेहमी संघर्ष करावा लागतोय.

शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना कधी खेळला?

मागचा आंतरराष्ट्रीय सामना तो याचवर्षी जानेवारी महिन्यात खेळला होता. सॅमसन देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन करतोय. भारतासाठी काही सामन्यात त्याने चांगली कामगिरी सुद्धा केलीय. त्याचं इनामही त्याला मिळालय.

बीसीसीआयचा चांगला निर्णय

संजू सॅमसन जानेवारी महिन्यानंतर भारतीय संघात स्थान बनवू शकलेला नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरीजआधी श्रेयस अय्यरला दुखापत झाली. पण त्यानंतरही संजूचा टीममध्ये समावेश करण्यात आला नाही. पण बीसीसीआयने आता वार्षिक कॉन्ट्रॅक्टमध्ये संजूचा समावेश केलाय.

सॅमसनचा कुठल्या ग्रेडमध्ये समावेश?

सॅमसनला ग्रेड सी च कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. ग्रेड सी मध्ये वार्षिक 1 कोटी रुपयांच कॉन्ट्रॅक्ट आहे. बीसीसीआयच्या ग्रेड सी मध्ये 11 खेळाडू आहेत. यात 6 नवीन खेळाडूंचा समावेश केलाय. सॅमसनशिवाय इशान किशन, दीपक हुड्डा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह आणि केएस भरतला सुद्धा कॉन्ट्रॅक्ट मिळालय. बीसीसीआय दरवर्षी वार्षिक करार जाहीर करते. या करारात A+, A, B आणि C अशा एकूण 4 श्रेणी असतात. बीसीसीआय खेळाडूच्या कामगिरीचं मूल्यमापन करुन संबंधित खेळाडूचा योग्यतेनुसार त्या त्या गटात श्रेणीत समावेश केला जातो तसेच श्रेणीनुसार वार्षिक वेतन ठरतं.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.