Barbados Team India Update : बार्बाडोसमधून टीम इंडियाबद्दल मोठी अपडेट, पुन्हा भारतात परतण्याच्या वेळेत बदल
Barbados Team India Update : T20 वर्ल्ड कप 2024 विजेती टीम इंडिया बार्बाडोसमधून मायदेशी कधी परतणार? हाच प्रश्न तमाम क्रिकेट चाहत्यांना पडलेला आहे. चाहते T20 वर्ल्ड कपची ट्रॉफी घेऊन येणाऱ्या आपल्या टीमच स्वागत करण्यासाठी उत्सुक्त आहेत. पण अजून टीम इंडिया मायदेशी परतलेली नाही. शनिवारी वर्ल्ड कप जिंकला, आज बुधवार आला, तर टीम भारतात आलेली नाही.
बार्बाडोसला बेरिल चक्रीवादळाने धडक दिली. याच ठिकाणी टीम इंडियाने शनिवारी दुसरा T20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला. टीम इंडियाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवला. बेरिल चक्रीवादळाचा प्रभाव आता ओसरला आहे. मात्र, तरीही टीम इंडियाला बार्बाडोसमधून निघण्यासाठी आणखी विलंब लागणार असल्याची माहिती आहे. ताज्या अपडेटनुसार, टीम इंडियाची फ्लाईट ठरलेल्या वेळेपेक्षा 5 ते 6 तास उशिराने उड्डाण करणार आहे. इतका विलंब का होणार? त्यामागे काय कारण आहेत, हे अद्याप समजू शकलेलं नाही. टीम इंडिया उशिराने निघणार याचा अर्थ, ते भारतातही ठरलेल्या वेळेपेक्षा उशिराने पोहोचणार.
बार्बाडोस एअरपोर्ट मंगळवार संध्याकाळपर्यंत खुला होणार असे मीडिया रिपोर्ट्स होते. स्थानिक वेळेनुसार, टीम इंडिया भारतात येण्यासाठी 6.30 वाजता रवाना होईल असं बातम्यांमध्ये म्हटलं होतं. आज म्हणजे बुधवारी संध्याकाळी 7.45 पर्यंत टीम इंडिया दिल्लीत दाखल होणार होती. पण ताज्या माहितीनुसार, टीम इंडियाच्या कार्यक्रमात बदल झाला आहे.
टीम इंडिया भारतात कधी येणार?
बार्बाडोसमधून मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडिया ठरलेल्या वेळेपेक्षा 5 ते 6 तास उशिराने निघणार आहे. म्हणजे संध्याकाळी जे फ्लाईट निघणार होतं, ते आता रात्री बार्बाडोसमधून उड्डाण करेल. भारतात पोहोचण्याच्या त्यांच्या वेळेतही इतकाच फरक दिसून येईल. रिपोर्ट्सनुसार, टीम इंडिया आता बुधवार संध्याकाळऐवजी गुरुवारी सकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत भारतात पोहोचू शकते.
त्या स्पेशल फ्लाइटच नाव काय?
टीम इंडिया चॅम्पियन विश्व कप 24 नावाच्या स्पेशल फ्लाइटने बार्बाडोसमधून उड्डाण करेल. भारतात दिल्लीमध्ये इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान लँड करेल अशी माहिती आहे.
टीम इंडियाला काय अडचणी आल्या?
टीम इंडियाला बार्बाडोसमध्ये आलेल्या बेरिल चक्रीवादळामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. शहरात वीज-पाणी व्यवस्था ठप्प झाली. त्यामुळे हॉटेलमध्ये अन्य सुविधा कमी करण्यात आल्या. टीम इंडियाच्या खेळाडूंना लाइन लावून पेपर प्लेटमध्ये जेवण जेवाव लागलं. शहरात कर्फ्यू सारखी स्थिती होती. कुठल्याही खेळाडूला हॉटेल बाहेर जाण्याची परवानगी नव्हती.