Jasprit Bumrah | हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहच ‘या’ तारखेला पुनरागमन, World Cup 2023 आधी मोठी गुड न्यूज

Jasprit Bumrah | बस झाली चर्चा, आतो तो येतोय. टीम इंडियाची ताकत कैकपटीने वाढणार. टीमला गरज असताना विकेट मिळवून देण्याची त्याची क्षमता आहे. धावा रोखण्याबरोबरच घातक यॉर्करे हे त्याचं मुख्य अस्त्र आहे.

Jasprit Bumrah | हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहच 'या' तारखेला पुनरागमन, World Cup 2023 आधी मोठी गुड न्यूज
Jasprit bumrahभारताचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह गेल्या अनेक दिवसांपासून संघाबाहेर आहे. मात्र बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये नेटमध्ये नव्या दमाने गोलंदाजीचा सराव करताना दिसला. Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 2:59 PM

मुंबई : टीम इंडियाला आशिया कप 2023 आधी मोठा दिलासा मिळालाय. टीम इंडियाचा हुकूमी एक्का परत येतोय. जसप्रीत बुमराह लवकरच पुनरागमन करणार आहे. पाठदुखी स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे जसप्रीत बुमराह मागच्या वर्षभरापासून क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहे. या दरम्यान तो आशिया कप 2022, T20 वर्ल्ड कप, भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरीज आणि WTC फायनल सारख्या महत्वाच्या सामन्यांना मुकला आहे.

पण आता वर्ल्ड कप आधी टीम इंडियासाठी एक मोठी गुड न्यूज आहे. जसप्रीत बुमराह वर्ल्ड कप 2023 मध्ये तुम्हाला खेळताना दिसू शकतो.

घातक यॉर्करे हे त्याचं मुख्य अस्त्र

हे सुद्धा वाचा

जसप्रीत बुमराह टीम इंडियाच प्रमुख अस्त्र आहे. त्याने टीम इंडियासाठी मैदानावर नेहमीच महत्वाची भूमिका बजावलीय. टीमला गरज असताना विकेट मिळवून देण्याची त्याची क्षमता आहे. धावा रोखण्याबरोबरच घातक यॉर्करे हे त्याचं मुख्य अस्त्र आहे.

कुठल्या सीरीमध्ये पुनरागमन करणार?

काही महिन्यांपूर्वी न्यूझीलंडमध्ये जसप्रीत बुमराहच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली होती. सध्या तो नॅशनल क्रिकेट अकादमीत आहे. तिथे त्याची रिहॅबची प्रोसेस सुरु आहे. आयर्लंड विरुद्ध तीन टी 20 सामन्यांची सीरीज होणार आहे. त्या सीरीजद्वारे जसप्रीत बुमराह मैदानावर पुनरागमन करु शकतो. या सीरीजद्वारे जसप्रीत बुमराहचा फिटनेस लक्षात येईल.

किती तारखेपासून सुरु होणार सीरीज?

जसप्रीत बुमराहकडे चांगली लय आहे. ऑयर्लंड विरुद्ध ऑगस्टमध्ये सीरीज होणार आहे. या सीरीजव्दारे जसप्रीत बुमराह पुनरागमन करु शकतो. जसप्रीत बुमराह NCA मध्ये व्ही.व्ही.एस लक्ष्मण आणि मेडिकल विभागाचे प्रमुख नितीन पटेल यांच्या देखरेखीखाली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या टीमसोबत काम केलेले फिजियोथरेपिस्ट एस रजनीकांत सुद्धा आहेत. 18 ऑगस्टपासून आयर्लंड विरुद्ध सीरीज सुरु होणार आहे. कुठलाही धोका पत्करणार नाही

नितीन पटेल आणि रजनीकांत भारतीय गोलंदाजांना दुखापतीमधून ठीक करण्यासाठी काम करतात. दोघांच बुमराहवर बारीक लक्ष आहे. त्यांना कुठलाही धोका पत्करायचा नाहीय. जसप्रीत बुमराह तंदुरुस्त होणं टीम इंडियासाठी खूप आवश्यक आहे. कारण आशिया कप नंतर वनडे वर्ल्ड कप आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.