Team India : वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त प्रदर्शन केल्यानंतर टीम इंडियाचा ‘हा’ बॉलर अचानक झाला गायब

Team India : आज तो गोलंदाज काय करतो ? कुठे आहे? कोणालाच माहित नाही, सगळेच त्याला विसरले. 2015 वर्ल्ड कपमध्ये त्याने शानदार गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या या वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने एकूण 13 विकेट काढले होते.

Team India : वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त प्रदर्शन केल्यानंतर टीम इंडियाचा 'हा' बॉलर अचानक झाला गायब
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 11:03 AM

Team India : भारतीय क्रिकेटमध्ये आज अनेक टॅलेंटेड खेळाडू आहेत. प्रत्येकालाच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळत नाही. काही खेळाडू एकाठराविक काळासाठी येतात. आपल्या प्रतिभेने लक्ष वेधून घेतात. त्यानंतर गायब होतात. आज आम्ही तुम्हाला टीम इंडियाकडून खेळलेल्या अशाच एका टॅलेंटेड गोलंदाजाबद्दल माहिती देणार आहोत. टीम इंडियाकडून एका वर्ल्ड कपमध्ये त्याने जबरदस्त प्रदर्शन केलं. पण आता त्याचं करिअर संपल्यात जमा आहे. तो गोलंदाज अशा प्रकारे विजनवासात जाईल, असं कोणालाही वाटलं नव्हतं.

आज केएल राहुलला जितकी, संधी मिळतेय, तितकी संधी त्याला मिळाली असती, तर त्याने कदाचित जागतिक क्रिकेटमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली असती. टीम इंडियात सिलेक्शन होणं जितकं अवघड असतं, त्यापेक्षा टीममध्ये आपलं स्थान टिकवून ठेवणं कठीण आहे.

टीम इंडियाकडून डेब्यु कधी केला?

टीम इंडियाच्या अशाच एक वेगवान गोलंदाजाच नाव आहे मोहित शर्मा. त्याने वर्ष 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यु केला. मोहित शर्मा सुरुवातीला भारतीय टीममधून खेळताना चांगल्या गतीने गोलंदाजी करायचा. आपला स्विंग आणि स्लोअर चेंडूने फलंदाजांना अडचणीत आणायचा.

प्रदर्शन कधीपासून बिघडलं?

मोहित शर्मा टीम इंडियाकडून वर्ष 2015 मध्ये वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळला. या टुर्नामेंटमध्ये त्याने दमदार प्रदर्शन केलं. वर्ल्ड कप 2015 नंतर त्याच्या कामगिरीत सातत्य राहिलं नाही. त्याच्या प्रदर्शनात घसरण झाली. त्यामुळे अखेर त्याला टीम इंडियातील आपलं स्थान गमवाव लागलं. मोहित शर्मा भारतीय संघातून 26 वनडे मॅच आणि 8 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळला आहे.

आयपीएलमध्ये कुठल्या टीमकडून डेब्यु?

मोहित शर्माने चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएल 2013 मध्ये डेब्यु केला. त्या सीजनमध्ये त्याने 6.43 च्या इकॉनमीने 20 विकेट्स घेतल्या. दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध सामन्यात त्याने 10 धावा देऊन 3 विकेट घेतल्या होत्या. त्याच्या पुढच्या सीजनमध्ये मोहितने 23 विकेट काढून खळबळ उडवून दिली. 2015 वर्ल्ड कपमध्ये किती विकेट काढले?

मोहितने आयपीएल 2014 मध्ये 23 विकेट काढून पर्पल कॅप मिळवली. आजही कुठल्याही अनकॅप्ड गोलंदाजाने एका सीजनमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा हा रेकॉर्ड आहे. या परफॉर्मन्सनंतर त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले. आयसीसी 2015 वर्ल्ड कपमध्ये त्याने शानदार गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या या वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने एकूण 13 विकेट काढले होते.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.