Team India | टीम इंडियाच्या माजी कोचच्या घरावर छापा, रुपयाने भरलेली बॅग मिळाल्याने खळबळ
Team India | IPL मधील फिक्सिंग प्रकरणातही त्यांची चौकशी झाली आहे. IPL 2019 दरम्यान गुजरात पोलिसांनी एका कॅफेवर छापा मारला होता. त्यावेळी अटक केलेल्या 19 जणांमध्ये ते सुद्धा होते.
Team India | टीम इंडियाच्या माजी कोचच्या घरावर पोलिसांचा छापा पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. भारतीय महिला क्रिकेट टीमचे माजी कोच तुषार अरोठे पुन्हा एकदा संशयाच्या फेऱ्यात आहेत. पुन्हा एकदा पोलिसांची संशयाची सुई त्यांच्याकडे आहे. तुषार अरोठे यांच्याघरी पैसे सापडल्याने त्यांची चौकशी झाली. वडोदरा पटपडगंज भागात तुषार अरोठे यांचं घर आहे. पोलिसांना त्यांच्या घरातून एक कोटी रुपये मिळाले. हे पैसे कुठून आले? कसे आले? याचा सोर्स काय? या प्रश्नांची भारतीय कोचकडून पोलिसांना समाधानकारक उत्तर मिळाली नाहीत.
आमच समाधान होईल, असं उत्तर अरोठे यांच्याकडून आम्हाला मिळालं नाही, असं वडोदरा पोलिसांनी प्रेस रिलीज जारी करुन सांगितलं. अरोठे यांच्या घरावर छापा मारल्यानंतर ग्रे कलरची एक बॅग मिळाली, त्यात एकूण 1.01 कोटी रुपयांची रक्कम होती असं वडोदरा पोलिसांनी सांगितलं. तुषार अरोठे यांचा पहिल्यांदाच पोलिसांशी सामना झालेला नाही. भारतीय महिला टीमचे कोच बनण्याआधी ते माजी रणजीपटू होते. IPL मधील फिक्सिंग प्रकरणातही तुषार अरोठे यांची चौकशी झाली आहे. IPL 2019 दरम्यान गुजरात पोलिसांनी एका कॅफेवर छापा मारला होता. त्यावेळी अटक केलेल्या 19 जणांमध्ये तुषार अरोठे सुद्धा होते. त्यावेळी अरोठे यांचा फोन आणि गाडी जप्त करण्यात आली होती.
मोबाइल APP वरुन सट्टा
पोलिसांनी जेव्हा अरोठे यांच्या मोबाइलची चौकशी केली, तेव्हा त्यांना बेटिंग APP मिळालं नाही. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती. पोलिसांनी ज्या कॅफेवर छापा मारला. त्यात तुषार अरोठेची सुद्धा भागीदारी होती. काही लोक माझ्या कॅफेमध्ये येऊन मोबाइल APP वरुन सट्टा लावत असतील, तर मला कसं समजणार? कॅफेमध्ये जे काही चालायच त्याची अरोठेला कल्पना होती, असं पोलिसांच म्हणणं होतं.
Gujarat: Former Indian Women Cricket Team Coach Tushar Arothe(pic 1) arrested in Vadodara in connection with IPL betting.JS Jadeja(pic 2),DCP Crime Branch,says,“We arrested Tushar Arothe along with 18 other persons during a raid at a cafe. Their phones&vehicles have been seized.” pic.twitter.com/YrC7bBT9G5
— ANI (@ANI) April 2, 2019
आयसीसी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये तेच कोच
हे घडण्याआधी तुषार अरोठे भारतीय महिला टीमचे कोच होते. त्यांनी 2018 साली व्यक्तीगत कारणांमुळे कोचपदाचा राजीनामा दिला होता. bcci ने हा राजीनामा स्वीकारलेला सुद्धा. भारतीय महिला क्रिकेट टीम जेव्हा 2017 आयसीसी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली, त्यावेळी तुषार अरोठेच कोच होते.