Rahul Dravid : राहुल द्रविड यांच्याप्रमाणे त्यांच्या मुलाकडूनही भरपूर अपेक्षा होत्या, पण पहिल्याच सामन्यात तो….

Rahul Dravid : राहुल द्रविड यांचा मुलगा समितने देशांतर्गत T20 लीग महाराजा ट्रॉफीमध्ये डेब्यु केला. समितची फलंदाजी पाहण्यासाठी फॅन्स खूप उत्साहीत होते. समितचे वडील राहुल द्रविड हे भारतीय क्रिकेटमधील एक मोठ नाव आहे. मागच्याच महिन्यात राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप जिंकला होता.

Rahul Dravid : राहुल द्रविड यांच्याप्रमाणे त्यांच्या मुलाकडूनही भरपूर अपेक्षा होत्या, पण पहिल्याच सामन्यात तो....
Rahul Dravid son SamitImage Credit source: X/Mysore Warriors
Follow us
| Updated on: Aug 16, 2024 | 1:07 PM

भारतीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविड हे ‘द वॉल’ म्हणून ओळखले जातात. आपल्या शानदार फलंदाजीच्या बळावर अनेकदा त्याने टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढलं आहे. अनेक सामन्यात विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मागच्या महिन्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडीयाने T20 वर्ल्ड कप जिंकला. राहुल द्रविडने आपल्या शानदार करियरमध्ये कसोटीत 52 च्या सरासरीने 13 हजारपेक्षा जास्त धावा केल्या. वनडेमध्ये 39 च्या सरासरीने 11 हजार धावा केल्या. द्रविड यांना क्लासिक बॅटिंग स्टाइल आणि टेक्निकसाठी ओळखलं जातं. आता राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविड सुद्धा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून क्रिकेटमध्ये आलाय. समितला महाराजा ट्रॉफीमध्ये एन्ट्री मिळाली. तिथे त्याला IPL मधल्या मोठ्या खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. पण पहिल्याच सामन्यात तो अपयशी ठरला.

महाराजा ट्रॉफी एक देशांतर्गत T20 लीग आहे. कर्नाटक क्रिकेटने या लीगच आयोजन केलय. यात 6 टीम्स सहभागी झाल्या आहेत. राहुल द्रविड यांच्या मुलाला मैसूर वॉरियर्सकडून खेळण्याची संधी मिळाली. त्यांनी समितला 50 हजार रुपयात विकत घेतलं. त्या टीममध्ये करुण नायर, कृष्णप्पा गौतम सारखे मोठे खेळाडू आहेत. आयपीएलसह टीम इंडियाकडून हे प्लेयर खेळले आहेत.

द्रविडच्या मुलाने किती धावा केल्या?

राहुल द्रविडप्रमाणे समितकडून सुद्धा फॅन्सना भरपूर अपेक्षा होत्या. नम्मा शिवमोग्गा विरुद्ध सामन्यात समित कमाल दाखवू शकला नाही. पहिली फलंदाजी करताना कॅप्टन नायरने समितला नंबर 4 वर पाठवलं. पण तो 9 चेंडूत फक्त 7 धावा करुन बाद झाला. त्याने या सामन्यात मोठी चूक केली. हार्दिक राजच्या गोलंदाजीवर डोड्डामणि आनंदकडे त्याने कॅच दिली. समित एक ऑल राऊंडर आहे. फलंदाजीसह मीडियम पेस गोलंदाजी करतो.

कोण जिंकलं?

राहुल द्रविडचा मुलगा समित भले बॅटने मोठ योगदान देऊ शकला नाही. पण त्यांची टीम जिंकली. शिवमोग्गाने टॉस जिंकून गोलंदाजी निवडलेली. पहिली फलंदाजी करताना मैसूरच्या टीमने जलद विकेट गमावल्या. मनोज भंडागेच्या 16 चेंडूतील 42 धावांच्या बळावर 159 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना शिवमोग्गाची चांगली सुरुवात झाली नाही. टीमने पावरप्लेमध्ये 3 विकेट गमावले. 9 ओव्हरमध्ये त्यांनी 5 विकेट गमावून 80 धावा केल्या होत्या. त्यानंतर पावसाने सामन्यात व्यत्यय आणला. डकवर्थ लुईस नियमानुसार मैसूरची टीम 7 धावांनी हा सामना जिंकली.

'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.