बापरे, गौतम गंभीरसाठी BCCI ने खजिनाच उघडला, पगार सोडा, 16 दिवसाच्या श्रीलंका टुरवरच मिळणार इतका पैसा
Gautam Gambhir head coach package : गौतम गंभीरच्या सॅलरीबद्दल खुलासा झाला आहे. पण सॅलरी पोटी मिळणारी रक्कम सोडाच. श्रीलंका दौऱ्यात भत्त्यापोटीच मिळणारी रक्कम इतकी आहे की, आकडा ऐकून डोळे विस्फारतील. बीसीसीआयने गौतम गंभीरसाठी जणू आपला खजिनाच उघडला आहे.
टीम इंडियाचे नवीन हेड कोच गौतम गंभीर यांनी पदभार संभाळला आहे. श्रीलंका दौऱ्यापासून त्यांचं काम चालू झालय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाचा हा पहिला परदेश दौरा आहे. गौतम गंभीर टीम इंडियाला सेवा देणार, त्यासाठी त्यांना BCCI कडून सॅलरी पोटी किती रक्कम मिळणार? या बद्दल अनेकांना उत्सुक्ता आहे. त्यांच्यासोबत बीसीसीआयने काय कॉन्ट्रॅक्ट केलाय?. या प्रश्नाच उत्तर आता मिळालं आहे. टीम इंडियाचे हेड कोच म्हणून गौतम गंभीर यांचं पॅकेज काय असेल?. रिपोर्ट्सनुसार गौतम गंभीर यांच्यासाठी खर्च होणाऱ्या रक्कमेचा आकडा ऐकून तुमचे डोळे विस्फारतील.
गौतम गंभीर यांना BCCI किती रक्कम देणार आहे?. सर्वप्रथम सॅलरी बद्दल जाणून घ्या. BCCI कडून गौतम गंभीर यांना वर्षाला 12 कोटी रुपये सॅलरी मिळणार आहे. वर्षाला 12 कोटी म्हणजे महिन्याचे झाले 1 कोटी रुपये. हेड कोच म्हणून त्यांचा हा पगार आहे. फक्त इतकच गौतम गंभीर यांना मिळणार आहे का? असा तुम्ही विचार करत असाल, तर चुकीचा विचार आहे.
16 दिवसांचा भत्ता किती?
रिपोर्ट्सनुसार, गौतम गंभीर यांना वर्षाला सॅलरी म्हणून 12 कोटी रुपये मिळतीलच. पण त्याशिवाय दुसऱ्या सुविधा सुद्धा आहेत. या मध्ये महत्त्वाच आहे, परदेश दौऱ्यांवर मिळणार दिवसाचा भत्ता. ही रक्कम 21 हजार रुपये आहे. भारतीय टीम सोबत गौतम गंभीर 22 जुलैला श्रीलंकेत दाखल झाले. 7 ऑगस्ट पर्यंत गंभीर परदेशात असेल. 16 दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यात गौतम गंभीर यांना भत्त्यापोटी मिळणारी रक्कमच 336000 रुपये आहे.
आणखी दोन हाय-फाय सुविधा
सॅलरी आणि भत्त्याशिवाय गौतम गंभीर यांना आणखी दोन सुविधा मिळतील. यात एक बिझनेस क्लासमधून प्रवास आणि दुसरी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये स्टे. सध्या श्रीलंका दौऱ्यात गंभीर यांना या दोन्ही सुविधा मिळाल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध T20 आणि वनडे सीरीज खेळणार आहे.