Gautam Gambhir : ‘गौतम गंभीर कधी माझा मित्र…’, टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूचा खुलासा

Gautam Gambhir : गौतम गंभीर यांच्यासोबत टीम इंडियातून खेळलेल्या एका क्रिकेटपटूने गंभीर यांच्याबाबत अनेक खुलासे केलेत. गौतम गंभीरसोबत नातं कसं आहे? गौतम गंभीरचा स्वभाव कसा आहे?

Gautam Gambhir : 'गौतम गंभीर कधी माझा मित्र...', टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूचा खुलासा
Gautam Gambhir
Follow us
| Updated on: Sep 16, 2024 | 1:24 PM

गौतम गंभीर आज टीम इंडियाचे हेड कोच आहेत. पण त्याआधी एक खेळाडू म्हणून गौतम गंभीर यांनी टीम इंडियात महत्त्वाची भूमिका बजावलीय. गौतम गंभीर यांच्यासोबत टीम इंडियातून खेळलेल्या एका क्रिकेटपटूने गंभीर यांच्याबाबत अनेक खुलासे केलेत. गौतम गंभीरसोबत नातं कसं आहे? गौतम गंभीरचा स्वभाव कसा आहे? क्रिकेटबद्दल गंभीरचा अप्रोच कसा होता? या सगळ्या मुद्यांवर हा क्रिकेटपटू बोललाय. हे सर्व सांगताना त्या क्रिकेटपटूने गौतम गंभीर कधी माझा मित्रच नव्हता, हे सुद्धा सांगितलं. या सर्व गोष्टी त्याने राज शमानी यांच्या यू-ट्यूब पॉडकास्टवर शेअर केल्या आहेत. हा क्रिकेटपटू दुसरा-तिसरा कोणी नसून आकाश चोप्रा आहे.

आज गौतम गंभीर भले टीम इंडियाचा हेड कोच असेल, पण आकाश चोप्रा सुद्धा हिंदी कॉमेंट्रीमधला चर्चित चेहरा आहे. दोघांच्या क्रिकेट करियरची सुरुवात जवळपास एकाचवेळेस झाली होती. आकाश आणि गंभीर दोघे दिल्लीमधून येतात. दोघे दिल्लीसाठी क्रिकेट खेळायचे. त्याशिवाय दोघांमध्ये एक समानता होती, ती म्हणजे दोघे ओपनर होते. याच समानतेमुळे दोघांमध्ये स्पर्धा होती. आकाश चोप्राच्या बोलण्यातून हीच गोष्ट लक्षात येते.

‘एकाच जागेसाठी आमच्यात स्पर्धा’

आकाश चोप्राने सांगितलं की, “मी आणि गंभीरने जेव्हापासून खेळायला सुरुवात केली, तेव्हापासून दोघांमध्ये स्पर्धा होती” “प्रामाणिकपणे सांगायच झाल्यास गंभीर कधी माझा मित्र नव्हताच. आम्ही स्पर्धक होतो. टीम इंडियातील एकाच जागेसाठी आमच्यात स्पर्धा होती, ती म्हणजे ओपनरची जागा” असं आकाश चोप्रा म्हणाला.

‘खेळाबद्दल सीरियस असलेला व्यक्ती’

आकाश चोप्राने गौतम गंभीरचा स्वभाव आणि क्रिकेटप्रती त्याचा जो उत्साह आहे, त्याचं कौतुक केलं. “तो एक झुंजार, मेहनती आणि आपल्या खेळाबद्दल सीरियस असलेला व्यक्ती आहे. तो मनाने चांगला आणि सच्चा माणूस आहे. श्रीमंत घरातून येणाऱ्या मुलांना इतकी मेहनत करताना पाहणं हैराण करणारं आहे. गंभीर पूर्ण दिवस मैदानात घालवायचा” अशा शब्दात आकाश चोप्राने त्याचं कौतुक केलं.

गौतम गंभीर भारताकडून किती वनडे, टेस्ट खेळला?

आकाश चोप्राने गंभीरचा उत्साह आणि मेहनतीच जे कौतुक केलं, त्याचं बक्षीसही त्याला मिळालं. आकाशा चोप्रा आणि गौतम गंभीर दोघेही टीम इंडियाकडून खेळले. पण दीर्घकाळ टीम इंडियाच प्रतिनिधीत्व केलं ते गौतम गंभीरने. आकाश चोप्रा भारताकडून फक्त 10 टेस्ट मॅच खेळला. गौतम गंभीरने तिन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडियाच प्रतिनिधीत्व केलं. भारताकडून गौतम गंभीर 58 टेस्ट, 147 वनडे आणि 37 T20 सामने खेळला.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.