IND vs AUS Final | फायनल खेळताना एमएस धोनी आणि रोहित शर्मामध्ये फरक दिसला ‘तो हाच’

IND vs AUS Final | म्हणून धोनी, धोनी आहे. रोहित शर्मा संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये उत्तम खेळला. पण फायनलमध्ये रोहितने जी चूक केली, ते पाहून एमएस धोनीची आठवण आली. काल देशवासियांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली. आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी अजून वाट पाहावी लागणार आहे. प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियालाने सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकला.

IND vs AUS Final | फायनल खेळताना एमएस धोनी आणि रोहित शर्मामध्ये फरक दिसला 'तो हाच'
MS Dhoni-Rohit SharmaImage Credit source: PTI/ICC
Follow us
| Updated on: Nov 20, 2023 | 12:00 PM

IND vs AUS Final | काल तमाम भारतीयांसाठी महत्त्वाचा दिवस होता. आपली टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली होती. सकाळपासूनच सगळ्यांच्या नजरा टीव्हीकडे लागल्या होत्या. टीम इंडियाची वर्ल्ड कप 2023 मधली कामगिरी पाहता आपणच विश्वविजेते बनणार हा सगळ्यांचा विश्वास होता. कारण या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सलग 10 सामने जिंकले होते. हे 10 विजय रडतखडत किंवा अटी-तटीच्या प्रसंगात मिळवलेले नव्हते. अगदी दिमाखदार, समोरच्या टीमला चारी मुंड्या चीत करणारे असे हे विजय होते. त्यामुळेच हा वर्ल्ड कप आपलाच आहे, असा सगळ्यांना विश्वास होता. दुर्देवाने फायनलमध्ये असं घडलं नाही. जे घडलं, त्यामुळे सर्वत्र एकच सन्नाटा पसरला. रात्री 10 नंतर जोरदार विजयाच्या सेलिब्रेशनचे प्लान आखले गेले होते. पण त्या सगळ्या योजना तशाच मनात राहिल्या. कारण फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियापेक्षा सरस खेळ दाखवला. 6 विकेट आणि 7 ओव्हर राखून आरामात विजय मिळवला.

टीम इंडियाच्या पराभवाच विश्लेषण करताना त्यामागे वेगवेगळी कारण दिसून येतील. त्यात एक प्रमुख नजरेत दिसून येणारी गोष्ट म्हणजे रोहित शर्माच आऊट होण. रोहित शर्मानेच टीम इंडियाला जोरदार सुरुवात करुन दिली होती. त्याने पहिल्या 10 ओव्हरमध्ये फटकेबाजी केल्याने ही स्टार्ट मिळाली होती. रोहितने अवघ्या 31 चेंडूत 47 धावा फटकावल्या. यात 4 फोर, 3 सिक्स होते. खरंतर रोहितला रोखणं मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड सारख्या टॉप बॉलरल जमत नव्हतं. रोहितची नजर चेंडूवर बसली होती. पण .ग्लेन मॅक्सवेलच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा मोह त्याला नडला. इथूनच टीम इंडियाची घसरण सुरु झाली. रोहित बाद झाल्यानंतर दुसरा इनफॉर्म प्लेयर श्रेयस अय्यर लगेच तंबूत परतला. त्यानंतर टीम इंडिया दबावाखाली आली ती अगदी शेवटपर्यंत. त्यातून सावरताच आलं नाही.

पण हा विचार त्याच्या खेळात दिसला नाही

फायनलमध्ये रोहित शर्माला समोरच्या टीमला धक्का देण्याची, आपला गिअर बदलण्याची संधी होती. पण हा विचार त्याच्या खेळात दिसला नाही. रोहित संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये जसा खेळत आलाय, तसाच तो फायनलमध्येही खेळला. त्यात काही चूक नव्हतं. या वर्ल्ड कपमध्ये रोहितने टीमच्या हिताला प्राधान्य देत अशीच स्टार्ट दिली होती. कालही त्याने तसच केलं. पण फायनलचा सामना आहे हे ओळखून विकेटवर थोडावेळ थांबायला पाहिजे होतं. तो चांगल्या चेंडूवर बाद झाला असता, तर हरकत नाही. रोहित शर्माने मॅक्सवेलला एक फोर, सिक्स मारला होता. असं असताना पुन्हा मोठा फटका खेळण्याचा मोह टीमवर भारी पडला.

धोनीने मोठा प्लेय़र काय असतो? ते दाखवून दिलं

इथे आठवतो तो एमएस धोनी. टीम इंडियाने धोनीच्या नेतृत्वाखाली 2011 साली दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. त्या वर्ल्ड कपमध्ये धोनी फायनलचा सामना खेळण्याआधी इतर सामन्यात फ्लॉप ठरलेला. पण श्रीलंकेविरुद्ध फायनलमध्ये धोनीने मोठा प्लेय़र काय असतो? ते दाखवून दिलं. श्रीलंकेच्या 275 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 114 धावांवर 3 विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी युवराज सिंहऐवजी धोनी स्वत: वरती आला. 79 चेंडूत 91 धावांची नाबाद मॅचविनिंग इनिंग खेळला. टीमची गरज ओळखून धोनीने त्या वर्ल्ड कप फायनलमध्ये खेळ दाखवला होता. रोहितने त्याच्या बाजूने काही चुकीच केलं नाही. पण फायनलमध्ये रोहितने थोडी जास्त जबाबदारी घेतली असती, आणखी 10 -15 ओव्हर विकेटवर उभा राहिला असता, तर कदाचित आज चित्र वेगळं दिसलं असतं.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.