World Cup 2023 | Team India च टेन्शन वाढवेल ‘हा’ 51 सेकंदाचा Video, जरा सांभाळून राहण्याची गरज

World Cup 2023 | टीम इंडियाला आता जास्त काळजी घ्यावी लागेल. एक 51 सेकंदाचा व्हिडिओ आहे. त्यामुळे फलंदाजांच्या मनात धडकी भरु शकते. आगामी आशिया कप आणि वर्ल्ड कप 2023 चा विचार करता, टीम इंडियाला थोडी सावधानता पाळावी लागेल.

World Cup 2023 | Team India च टेन्शन वाढवेल 'हा' 51 सेकंदाचा Video, जरा सांभाळून राहण्याची गरज
Rohit sharma-Rahul Dravid
Follow us
| Updated on: Jul 02, 2023 | 10:31 AM

नवी दिल्ली : जुलै महिना सुरु झालाय. टीम इंडिया पुन्हा तुम्हाला Action मध्ये दिसेल. 12 जुलैपासून वेस्ट इंडिज विरुद्ध टेस्ट सीरीज सुरु होणार आहे. त्यानंतर वनडे आणि T20 सीरीज आहे. टीम इंडियासाठी हा दौरा महत्वाचा आहे. पण सर्वांना प्रतिक्षा आहे, ती ऑगस्ट महिन्याची. कारण, तेव्हा भारत-पाकिस्तानच्या टीम आशिया कपमध्ये आमने-सामने येतील. या मॅचला अजून वेळ आहे. पण त्याआधी एक व्हिडिओ समोर आलाय. त्यामुळे टीम इंडियाच टेन्शन वाढेल.

31 ऑगस्टपासून पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये आशिया कप 2023 ची सुरुवात होईल. यावेळी टुर्नामेंट वनडे फॉर्मेटमध्ये खेळला जाणार आहे. कारण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वनडे वर्ल्ड कप आहे. BCCI आणि PCB मध्ये आशिया कपच्या आयोजनावरुन बराच वाद झाला. त्यानंतर अखेर ही स्पर्धा होत आहे.

दहशत निर्माण करणारा व्हिडिओ

वर्ल्ड कपच्या आधी क्रिकेट रसिकांना आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याचा आनंद घेता येईल. पाकिस्तानचा सामना करताना टीम इंडियाला आता जास्त काळजी घ्यावी लागेल. एक 51 सेकंदाचा व्हिडिओ आहे. त्यामुळे फलंदाजांच्या मनात धडकी भरु शकते. पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचा हा व्हिडिओ आहे. यात त्याने बॅट्समनची अक्षरक्ष: वाट लावलीय.

एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट

डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी इंग्लंडमध्ये सध्या T20 ब्लास्ट टुर्नामेंटमध्ये खेळतोय. शाहीन नॉटिंघमशायर टीमकडून खेळतोय. शुक्रवारी संध्याकाळी त्याने एका मॅचमध्ये इनिंगच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 4 विकेट काढले. T20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालय.

टीम इंडियासाठी धोका

शाहीन शाह आफ्रिदी मागच्या काही महिन्यापासून फिटनेसच्या समस्येचा सामना करत होता. आता त्याची गोलंदाजी पाहून पाकिस्तानी फॅन्स नक्कीच खूश होतील. कारण 22 वर्षाचा पेसर आता पूर्णपणे फिट आणि फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियासाठी ही काळजी वाढवणारी बाब आहे.

शाहीन शाह आफ्रिदीचा हा फॉर्म कुठल्याही फलंदाजावर भारी पडू शकतो. पहिल्याच ओव्हरमध्ये त्याची विकेट घेण्याची सवय आणि क्षमता टीम इंडियाची अडचण वाढवू शकते. शाहीन सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये एक-दोन यॉर्कर आणि वेगवान इनस्विंगर टाकून फलंदाजांचा खेळ संपवतो.

आधी सुद्धा केलय नुकसान

आशिया कप आणि वर्ल्ड कपमध्ये शाहीन शाह आफ्रिदी भारतासाठी धोकदायक ठरु शकतो. 2021 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध शाहीन शाह आफ्रिदीच प्रदर्शन सगळ्यांनाच ठाऊक आहे. मागच्या T20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय फलंदाजांनी त्याची चांगलीच धुलाई केली होती. पण आता भारताला सर्तक राहण्याची आवश्यकता आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.