Rohit Sharma: विंडिज विरुद्ध सीरीजमध्ये एक प्रश्न निर्माण होणार, रोहितला राहुलबाबत निर्णय घ्यावाच लागेल
नियमित कर्णधार म्हणून संघात परतल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या सीरीजच्या निमित्ताने या प्रश्नावर उत्तर शोधावं लागेल. वेस्ट इंडिजचा संघ अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे.
मुंबई: वेस्ट इंडिज विरुद्धच्या (IND vs WI) आगामी वनडे आणि टी-20 सीरीजमध्ये भारतीय संघासमोर एक प्रश्न निर्माण होणार आहे. रोहित शर्मा (Rohit sharma) नियमित कर्णधार म्हणून संघात परतल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या सीरीजच्या निमित्ताने या प्रश्नावर उत्तर शोधावं लागेल. वेस्ट इंडिजचा संघ अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे. आधी तीन वनडे आणि त्यानंतर कोलकात्यामध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. रोहित संघात परतल्यामुळे सलामीला कोण जाणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. भारताच्या वनडे टीममध्ये शिखर धवनची (Shikhar Dhawan) निवड झाली आहे. शिखर धवनने नुकत्याच संपलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये दमदार कामगिरी केली होती. शिखर धवन आणि रोहित नेहमीच सलामीला उतरले आहेत.
दक्षिण आफ्रिकेत रोहित नसल्यामुळे केएल राहुल सलामीवीर म्हणून येत होता. पण आता राहुल कुठल्या क्रमाकांवर खेळणार पहिल्या कि, चौथ्या ते ठरवावं लागेल, असं भारताचे माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर यांनी म्हटलं आहे. “केएल राहुल सलामीवीर आहे की, चौथ्या क्रमांकावर येणार ते आधी ठरवावं लागेल. दक्षिण आफ्रिकेत राहुल कॅप्टन होता, तो सलामीला आला. माझ्या दृष्टीने ते निराशाजनक होतं, कारण राहुल चौथ्या आणि पाचव्या नंबरवर जास्त यशस्वी ठरला आहे” असे अजित आगरकर स्टार स्पोर्ट्सवरील कार्यक्रमात म्हणाले.
राहुल भविष्य आहे, तर…. राहुल भविष्य आहे, तर शिखर धवन जास्तीत जास्त पुढचा वर्ल्डकप खेळू शकतो. दक्षिण आफ्रिकेत शिखर धवनला धावा करायचाच होत्या. अन्यथा त्याला पुढची संधी मिळाली नसती, त्यामुळे टीम मॅनेजमेंट राहुल आणि शिखरमध्ये काय निर्णय घेते? ते पाहावे लागेल.
ODI squad: Rohit Sharma (Capt), KL Rahul (vc), Ruturaj Gaikwad, Shikhar, Virat Kohli, Surya Kumar Yadav, Shreyas Iyer, Deepak Hooda, Rishabh Pant (wk), D Chahar, Shardul Thakur, Y Chahal, Kuldeep Yadav, Washington Sundar, Ravi Bishnoi, Mohd. Siraj, Prasidh Krishna, Avesh Khan
— BCCI (@BCCI) January 26, 2022
तुमच्याकडे इशान किशन सारखा स्फोटक फलंदाज अजित आगरकरच्या मते, सलामीसाठी वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी करता येऊ शकते. केएल राहुलला सलामीला आणण्याचा भविष्यात फायदा होईल हे खात्रीलायकपणे सांगता येत नाही. तुमच्याकडे इशान किशन, ऋषभ पंतसारखे आक्रमक फलंदाज आहेत, त्यांना वरती संधी देऊन पाहायला हरकत नाही असं आगरकर म्हणाले. वेस्ट इंडिज विरुद्ध मालिकेत कॅप्टन म्हणून रोहितला अनेक पर्यायांची चाचपणी करावी लागेल.