Team India : सिलेक्टर्सनी एका टॅलेंटेड खेळाडूच करियर जवळपास संपवलं, WTC Final साठी साधा भावही दिला नाही

WTC Final 2023 : टीम इंडियाच्या या खेळाडूकडे चांगल टॅलेंट आहे. मात्र, तरीही सिलेक्टर्सनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी साधा त्याचा विचारही केला नाही. या खेळाडूची तुलना ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी केली जायची.

Team India : सिलेक्टर्सनी एका टॅलेंटेड खेळाडूच करियर जवळपास संपवलं, WTC Final साठी साधा भावही दिला नाही
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 1:38 PM

नवी दिल्ली : टीम इंडियाच्या एका टॅलेंटेड क्रिकेटरच करियर सिलेक्टर्सनी जवळपास संपुष्टात आणलय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये सिलेक्टर्सनी या मोठ्या खेळाडूला साधा भाव दिला नाही. 7 ते 11 जून दरम्यान इंग्लंडच्या केनिंगटन ओव्हल मैदानावर होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी सिलेक्टर्सनी टीम इंडियाची घोषणा केली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी टीम इंडियाची घोषणा होताच एका क्रिकेटरच मन मोडलय.

भारताचा हा टॅलेंटेड खेळाडू आहे. मात्र, तरीही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी सिलेक्टर्सनी त्याला टीम इंडियात संधी दिली नाही. एकवेळ टीम इंडियाच्या या खेळाडूची तुलना ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी केली जायची. पण आता हा खेळाडू टीम इंडियात नाहीय.

रणजी सीजनमध्ये किती धावा केल्या?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी मयंक अग्रवालचा विचार करायला हरकत नव्हती. मयंक अग्रवालने 2022-23 च्या रणजी सीजनमध्ये कर्नाटककडून खेळताना 9 सामन्यात 13 इनिंगमध्ये 82.50 च्या सरासरीने 990 धावा केल्यात. यात तीन शतक आणि सहा अर्धशतक आहेत. मयंक अग्रवालचा बेस्ट स्कोर 249 आहे. त्याच्या बळावर कर्नाटकच्या टीमने सेमीफायनलपर्यंतचा प्रवास केला.

WTC Final साठी साधा भाव दिला नाही

इतका चांगला रेकॉर्ड असूनही सिलेक्टर्सनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी मयंक अग्रवालला भारतीय टेस्ट टीममध्ये संधी दिलेली नाही. मयंक अग्रवाल मागच्या वर्षभरापासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. मयंक अग्रवाल टीम इंडियाकडून शेवटची टेस्ट मॅच मार्च 2022 मध्ये श्रीलंके विरुद्ध खेळला होता, तेव्हापासून तो टीम इंडियाच्या बाहेर आहे. केएल राहुलमुळे त्याचा विचार केला नाही

मयंक अग्रवालने रणजी सीजन 2022-23 मध्ये सर्वाधिक 990 धावा करुन टीम इंडियात पुनरागमनासाठी आपला दावा ठोकला होता. पण सिलेक्टर्सनी केएल राहुलसमोर मयंकचा विचारच केला नाही. मयंकसाठी यंदाचा रणजी सीजन खूपच शानदार होता. त्यामुळे टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी तो दावेदार होता.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.