IND vs AUS World Cup 2023 | शुभमन गिलला डेंग्यु, मग रोहित शर्मासोबत ओपनिंगला कोण येणार?

IND vs AUS World Cup 2023 | टीम इंडियासमोर काय ऑप्शन आहेत?. टीम इंडियासाठी वर्ल्ड कपमधील आपला पहिला सामना खेळण्याआधीच अडथळ्याची शर्यत सुरु झाली आहे.

IND vs AUS World Cup 2023 | शुभमन गिलला डेंग्यु, मग रोहित शर्मासोबत ओपनिंगला कोण येणार?
ODI World cup 2023 shubman gill suffering with dengueImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Oct 06, 2023 | 10:40 AM

चेन्नई : वर्ल्ड कप 2023 मधला पहिला सामना खेळण्याआधीच टीम इंडियाला मोठा झटका बसलाय. फॉर्ममध्ये असलेल्या टीमच्या टॉप प्लेयरला डेंग्युची लागण झालीय. वर्ल्ड कप 2023 टुर्नामेंटमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध अभियान सुरु करण्याआधीच टीम इंडियासाठी हा धक्का आहे. ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य टीम विरुद्ध विजयी सुरुवात झाल्यास संपूर्ण टीमचा आत्मविश्वास वाढतो. पण टीम इंडियासाठी वर्ल्ड कपमधील आपला पहिला सामना खेळण्याआधीच अडथळ्याची शर्यत सुरु झाली आहे. टीम इंडियाला आता यातून मार्ग काढावा लागेल. टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिलला डेंग्युची लागण झालीय. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. त्यामुळे शुभमन गिलच ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या सामन्यात खेळणं कठीण दिसतय. येत्या 8 ओक्टोबरला चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामना होईल.

शुभमग गिल टीम इंडियाकडून ओपनिंगला येतो. रोहित शर्मासोबत त्याने अनेक सामन्यात सलामीवीराची भूमिका बजावली आहे. शुभमन गिल जबरदस्त फॉर्ममध्ये सुद्धा आहे. त्यामुळे तो खेळला नाही, तर टीम इंडियाला निश्चितच त्याचा फटका बसेल. आज शुभमन गिलची आणखी एक टेस्ट होणार असल्याची माहिती आहे, त्यानंतर शुभमन गिल खेळणार की नाही? ते स्पष्ट होईल. गिलने अलीकडेच 24 सप्टेंबरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात दमदार शतक झळकावल होतं. मोहालमीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने 74 धावा केल्या होत्या. शुभमन गिलने मागच्या वर्षभरात वनडे आणि टी 20 मध्ये खोऱ्याने धावा केल्या आहेत. शुभमन गिल खेळणार नसेल, तर त्याच्याजागी दुसरा ओपनिंग पार्ट्नर निवडण्याच आव्हान रोहित शर्मासमोर असेल.

शुभमन गिलच्या जागी हाच परफेक्ट ऑप्शन

शुभमन गिल खेळला नाही, तर त्याच्याजागी रोहित शर्मा-राहुल द्रविड जोडी इशान किशनची निवड करु शकते. सलामीसाठी टीम इंडियाकडे इशान किशनच्या रुपानेच परफेक्ट पर्याय आहे. केएल राहुल सुद्धा प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे. त्याच्याकडे सुद्धा ओपनिंगला येण्याचा अनुभव आहे. पण केएल राहुलला ओपनिंगपेक्षा मीडल ऑर्डरमध्ये खेळायला जास्त आवडतं. सध्या तो मिडल ऑर्डरमध्ये सेट झालाय. नुकत्याच झालेल्या आशिया कप आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरीजमध्ये केएल राहुलने मधल्याफळीत खेळताना चांगल्या धावा केल्या आहेत. उलट मिडल ऑर्डरमध्ये त्याचा जास्त फायदा आहे. त्यामुळे रोहित-द्रविड जोडी ऑस्ट्रेलिया विरुद्ध इशान किशनला उतरवू शकते. इशान किशनने फक्त बांग्लादेश विरुद्ध शतक झळकवलय. पण आशिया कपमध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती. मधल्याफळीत इशान किशनची सरासरी 29 आहे, तेच ओपनर म्हणून 40 ची सरासरी आहे.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.