Kedar Jadhav | युवराजची टीम इंडियात निवड त्याच्याजागी पुणेकर केदार जाधवला संधी
Kedar Jadhav | त्याच्याजागी केदार जाधवची निवड झालीय. केदार जाधव टीम इंडियाकडून 73 वनडे सामने खेळलाय. फेब्रुवारी 2020 पासून तो टीम इंडियाच्या बाहेर आहे.
मुंबई : टीम इंडियाकडून खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या पुणेकर केदार जाधवला पुन्हा एकदा आपल्या बॅटची ताकत दाखवून देण्याची संधी आहे. सध्या देशांतर्गत क्रिकेटमधील दुलीप ट्रॉफी ही महत्वाची स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत केदार जाधवची वेस्ट झोनच्या टीममध्ये निवड झालीय. युवराज दोडीयाच्या जागी केदारची निवड झालीय. आगामी एमर्जिंग टीम्स एशिया कपसाठी युवराज दोडीयाची इंडिया A मध्ये निवड झालीय. त्याच्याजागी केदार जाधवची निवड झालीय. केदार जाधव टीम इंडियाकडून 73 वनडे सामने खेळलाय.
केदार जाधव आता 38 वर्षांचा आहे. फेब्रुवारी 2020 पासून तो टीम इंडियाच्या बाहेर आहे. IPL ऑक्शनमध्ये त्याला कोणी विकत घेतल नव्हतं. यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या टीममध्ये डेविड विलीच्या जागी त्याची निवड करण्यात आली. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये केदार जाधवचा दमदार रेकॉर्ड आहे. त्याने 48.07 च्या सरासरीने 5721 धावा केल्या आहेत. यात 82 सामन्यात 16 सेंच्युरी आहेत.
कशी आहे युवराजची कामगिरी?
युवराज दोडीया हा सौराष्ट्राचा उदयोन्मुख ऑफ स्पिनर आहे. मागच्यावर्षी त्याने रणजी ट्रॉफीमध्ये डेब्यु केला. सात सामन्यात 31 विकेट काढून त्याने प्रभावित केलं. एक सामन्यात त्याने 5 विकेट काढले. निवड समितीने त्याच्या या कामगिरीच दखल घेतली. युवराज दोडीयाला आशिया कप स्पर्धेत इंडिया A कडून संधी मिळाली आहे. या महिन्याच्या अखेरीस बांग्लादेशमध्ये आशिया कप स्पर्धा होणार आहे. फायनल कधी?
दुलीप ट्रॉफी 2023-24 स्पर्धा 28 जूनला सुरु झाली. 12 जुलैपासून फायनल सुरु होईल. इस्ट झोन, वेस्ट झोन, नॉर्थ झोन, साऊथ झोन, सेंट्रल झोन आणि नॉर्थ ईस्ट झोनच्या टीम या स्पर्धेत खेळल्या. बँगलोरमध्ये वेस्ट झोन आणि साऊथ झोनमध्ये 12 जुलैपासून फायनल रंगणार आहे.