Mohammed Shami : कोट्यवधीचा मालक पण शमीला दुसऱ्याच्या घरी घ्यावी लागलेली शरण, त्या दिवशी काय घडलेलं?

Mohammed Shami Birthday : मोहम्मद शमीचा बर्थ डे असून तो आज 34 वर्षांचा झाला. मोहम्मद शमी आज यशस्वी गोलंदाज आहे. पण त्याचा संघर्षही तितकाच मोठा आहे. व्यक्तीगत आयुष्यात शमीने अशी दु:ख बघितली आहेत, ज्याची कोणाला कल्पना नसेल.

Mohammed Shami : कोट्यवधीचा मालक पण शमीला दुसऱ्याच्या घरी घ्यावी लागलेली शरण,  त्या दिवशी काय घडलेलं?
mohammed shamiImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Sep 03, 2024 | 1:59 PM

टीम इंडियाच्या अव्वल गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमीचा समावेश होतो. आज 3 सप्टेंबरला मोहम्मद शमीचा बर्थ डे असून तो 34 वर्षांचा झाला. मोहम्मद शमीची गणना जगातील टॉप बॉलर्समध्ये होते. त्याच्याकडे आज पैसा, प्रसिद्धी सगळं आहे. पण आयुष्यात एकवेळ अशी सुद्धा होती, जेव्हा त्याला दुसऱ्यांच्या घरी रहावं लागलेलं. आर्थिक अडचणी होत्या. मोहम्मद शमीला क्रिकेट खेळण्यासाठी आपलं घरही सोडावं लागलेलं. मोहम्मद शमीची ती गोष्ट जाणून घ्या, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहितीय.

मोहम्मद शमीचा जन्मू यूपीच्या अमरोहा येथे झाला. तो येथे भरपूर क्रिकेट खेळला. पण वरच्या स्तराच क्रिकेट खेळण्याची फार संधी मिळाली नाही. त्यानंतर शमीचे कोच बदरुद्दीन सिद्दीकी यांनी त्याला अमरोहावरुन कोलकाताला जाण्याचा सल्ला दिला. शमीने कोचचा सल्ला ऐकून 2005 मध्ये कोलकाताला आपला बेस बनवलं. तिथे त्याने डलहौजी एथलेटिक क्लब जॉइन केला. तिथे क्रिकेट एसोसिएशन ऑफ बंगालचे असिस्टेंट सेक्रेटरी देबब्रत दास यांची शमीवर नजर गेली.

कोण आहेत देबब्रत दास?

शमीने गोलंदाजीवर ते भरपूर प्रभावित झाले. त्यांनी मोहम्मद शमीची सौरभ गांगुलीशी भेट घडवून आणली. शमीने गांगुलीला गोलंदाजी केली. गांगुलीने देबब्रत यांना शमीची काळजी घेण्याचा सल्ला दिला. देबब्रत दास यांनी मोहम्मद शमीला टाऊन क्लब टीममध्ये स्थान दिलं. त्याच्यासोबत 75000 रुपयाच कॉन्ट्रॅक्ट केला. शमीकडे रहायला जागा नव्हती. त्यावेळी दास यांनी त्याला आपल्या घरात रहायला जागा दिली. शमीने त्यावर्षी खूप मेहनत केली. पण त्याला बंगालच्या अंडर 22 टीममध्ये स्थान मिळू शकलं नाही.

शमीने पाकिस्तान विरुद्ध डेब्यु मॅचमध्ये किती विकेट काढले?

कठोर मेहनीच्या बळावर मोहम्मद शमीने 2010 साली बंगालच्या फर्स्ट क्लास टीममध्ये स्थान मिळवलं. आसाम विरुद्ध त्याने डेब्यु केला. शमीने तीन वर्ष इतकं शानदार प्रदर्शन केलं की, त्याला टीम इंडियात स्थान मिळालं. शमी पाकिस्तान विरुद्ध डेब्यु सामना खेळला. त्याने कमालीची गोलंदाजी केली. त्याला फक्त एक विकेट मिळाला. पण त्याच्या पेस आणि स्विंगने पाकिस्तानी फलंदाजांना चांगलच हैराण केलं.

किती कोटी संपत्तीचा मालक?

आज मोहम्मद शमीच्या नावावर 64 कसोटी सामन्यात 229 विकेट आहेत. 101 वनडेमध्ये 195 विकेट घेतलेत. आयपीएलमध्ये 127 विकेट नावावर आहेत. कधी दुसऱ्याच्या घरात आश्रय घेणारा शमी आज कोट्यवधीच्या संपत्तीचा मालक आहे. त्याच्याकडे आज 50 कोटी पेक्षा जास्त संपत्ती आहे. अमरोहा येथे मोठ फार्म हाऊस आहे. तिथे त्याने प्रॅक्टिससाठी पर्सनल मैदान आणि नेट्स बनवले आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.