TNPL 2023 : टीम इंडियाचा एक मोठा प्लेयर फक्त 10 लाख रुपयात भारतातील एका छोट्या लीगमध्ये का खेळतो?

TNPL 2023 : काही जण लंडनमध्ये थांबले, काही कुटुंबासोबत सुट्टय़ा घालवण्यासाठी परदेशात निघून गेले. पण तो तुलनेने छोट्या लीगमध्ये खेळण्यासाठी भारतात परतला.

TNPL 2023 : टीम इंडियाचा एक मोठा प्लेयर फक्त 10 लाख रुपयात भारतातील एका छोट्या लीगमध्ये का खेळतो?
कमकुवत संघांना नाही तर बलाढ्य संघाला पराभूत संघ महान होतो, असंही सुनील गावस्कर यांनी पुढे सांगितलं.
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 11:02 AM

चेन्नई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 209 धावांनी मोठा विजय मिळवला. टीम इंडियाच्या या मानहानीकारक पराभवानंतर टीम इंडियाचे चाहते निराश आहेत. टेस्ट टीममध्ये बदलाची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. लवकरच बीसीसीआयकडून त्या दिशेने पावल उचलली जाऊ शकतात. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पराभवानंतर टीम इंडियातील काही प्लेयर्स लंडनमध्ये थांबले आहेत.

काही प्लेयर्स कुटुंबासोबत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी दुसऱ्यादेशात निघून गेले. पण टीम इंडियात असा एक प्लेयर आहे, जो IPL च्या तुलनेत एक छोटी लीग टुर्नामेंट खेळण्यासाठी भारतात परतला.

तुम्ही एकदम बरोबर विचार करताय

महत्वाच म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये त्याच्याविषयी बरीच चर्चा झाली. त्याला प्लेइंग 11 मध्ये का स्थान दिलं नाही? यावरुन दिग्गज क्रिकेटपटुंनी राहुल द्रविड, रोहित शर्मा जोडीला प्रश्न विचारले. तुम्ही बरोबर विचार करताय, आपण बोलतोय रविचंद्रन अश्विनबद्दल.

10 लाख रुपये मिळतात, त्या टुर्नामेंटमध्ये का खेळतोय?

अश्विनला टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली नाही. पण तो आता एका छोट्या टुर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी तयार आहे. तिथे कोणी अश्विनला बाहेर बसवू शकत नाही. प्रश्न फक्त एकच आहे, फक्त 10 लाख रुपये मिळतात, त्या टुर्नामेंटमध्ये अश्विन का खेळतोय?

तो, सुद्धा असं करु शकत होता, पण….

WTC फायनल झाल्यानंतर टीम इंडियाचे काही प्लेयर्स लंडनमध्येच थांबले. काही कुटुंबासोबत सुट्टया एन्जॉय करण्यासाठी निघून गेले. अश्विनही असं करु शकत होता. पण तो तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये खेळण्यासाठी मायदेशी परतला.

कुठल्या टीमकडून खेळणार?

अश्विन सुरुवातीपासून या टुर्नामेंटमध्ये खेळतोय. या सीजनमध्ये तो डिंडिगुल ड्रॅगन्सच्या टीमसाठी खेळणार आहे. बुधवारी 14 जून रोजी पहिली मॅच आहे. म्हणून अश्विन लंडनहून थेट चेन्नईमध्ये दाखल झाला. अश्विनला डिंडिगुल ड्रॅगन्सने 10 लाख रुपयांमध्ये रिटेन केलय. तुम्ही म्हणाल अश्विन फक्त 10 लाख रुपयांसाठी या टुर्नामेंटमध्ये का खेळतोय? इतका मोठा प्लेयर का खेळतो? ते समजून घ्या

TNPL चं महत्व समजून घेणं आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आयपीएलने भारतीय क्रिकेटला मजबुती प्रदान केलीय. अनेक नवे खेळाडू दिलेत, तसंच TNPL ने तामिळनाडू क्रिकेटला बळकट केलय. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचा प्रभाव दिसतो. तामिळनाडूची टीम सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये यशस्वी ठरली. याच कारण TNPL आहे. प्रत्येक सीजनमध्ये TNPL चा स्तर उंचावत चालला आहे. त्यामुळे अश्विन संधी मिळेल, तेव्हा या लीगमध्ये खेळतो. अश्विनसाठी ही टुर्नामेंट पैसा नाही, तर क्रिकेटशी स्वत:ला जोडून ठेवण्याच एक माध्यम आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.