Team India | टीम इंडियाचा एक प्लेयर वारंवार संधी मिळूनही फेल, वर्ल्ड कपची आशा त्याने सोडून द्यावी
Team India | आता त्याला संधी दिली नाही, म्हणून कोणीही आंदोलन करु नये. वर्ल्ड कप स्पर्धेला दीड महिन्यापेक्षा कमी कालावधी उरला आहे. राहुल द्रविड आणि कॅप्टन रोहित शर्मा यांना काही खेळाडूंचा खेळ पाहता आला.
फ्लोरिडा : टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचा शेवट पराभवाने झाला. अखेरच्या टी 20 सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेटने पराभव झाला. या सामन्यासह टीम इंडियाने सीरीजही गमावली. वेस्ट इंडिजने टी 20 सीरीज 3-2 ने जिंकली. खरंतर टीम इंडियाने पहिले दोन सामने गमावल्यानंतर टी 20 सीरीजमध्ये पुनरागमन केलं होतं. टीम इंडियाने वेस्ट इंडिज दौऱ्यावर टेस्ट आणि वनडे सीरीज जिंकली. पण T20 सीरीजमुळे दौऱ्यावर क्लीन स्वीप करण्याची संधी गमावली. आता वर्ल्ड कप स्पर्धेला दीड महिन्यापेक्षा कमी कालावधी उरला आहे.
त्यामुळे हा वेस्ट इंडिज दौरा टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा होता. या दौऱ्याच्या निमित्ताने टीम इंडियाला अनेक खेळाडूंची चाचपणी करता आली. टीममध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी दिली.
कुठल्या प्लेयर्सनी छाप उमटवली?
आगामी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी टीम निवडण्याआधी हेड कोच राहुल द्रविड आणि कॅप्टन रोहित शर्मा यांना काही खेळाडूंचा खेळ पाहता आला. या परफॉर्मन्सच्या आधारावर अजून कुठल्या प्लेयर्सना वर्ल्ड कप आधी संधी द्यायची ते ठरणार आहे. वर्ल्ड कपची टीम निवडता संतुलित संघ निवडण्यावर दोघांचा भर असेल. या दौऱ्यात यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, मुकेश कुमार सारख्या प्लेयर्सनी आपली छाप उमटवली.
वनडे आणि टी 20 दोघांमध्ये त्याला संधी
त्यांच्याकडे टीम इंडियाच भविष्य म्हणून पहायला हरकत नाही, असं त्यांचं खेळ पाहून वाटलं. त्याचवेळी अशाही एका प्लेयरला संधी दिली, जो मागची काही वर्ष सतत टीममध्ये आत-बाहेर करत होता. संजू सॅमसन असं त्या प्लेयरच नाव आहे. संजू सॅमसनला चालू वेस्ट इंडिज दौऱ्यात बऱ्यापैकी संधी दिली. वनडे आणि टी 20 दोन्ही फॉर्मेटमध्ये त्याला खेळवलं.
सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करायचे
याआधी संजू सॅमसनला संधी देत नाही, असं बोललं जात होतं. त्याच्यासाठी अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती. बीसीसीआयवर बोचरी टीका केली होती. आता संजूला वनडे आणि टी 20 दोघांमध्ये संधी मिळाली. पण संजूला छाप उमटवणारी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याला आशिया कप आणि त्यानंतर होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. दोन्ही फॉर्मेटमध्ये त्याचा परफॉर्मन्स कसा आहे?
वेस्ट इंडिज विरुद्ध दुसऱ्या वनडेमध्ये त्याने 9 आणि तिसऱ्या वनडेत 41 चेंडूत 51 धावा केल्या. यात 2 फोर आणि 4 सिक्स आहेत. तेच T20 च्य़ा 3 इनिंगमध्ये बॅटिंगची संधी मिळाली. पण त्याने फक्त 32 धावा केल्या. यात 13 ही त्याची मोठी धावसंख्या आहे. या कामगिरीच्या आधारावर त्याला पुन्हा संधी देणार असं ठामपणे म्हणता येणार नाही. कारण अनेक युवा प्लेयर्स रांगेत आहेत.