T20 World Cup 2024 : अमेरिकेच्या ‘या’ गावात टीम इंडिया मुक्कामाला, वर्ल्ड कपची तयारी सुरु

T20 World Cup 2024 : टीम इंडिया टी20 वर्ल्ड कप 2024 च्या ग्रुप ए मध्ये आहे. तिथे, त्यांना 4 पैकी 3 मॅच न्यूयॉर्कमध्ये तयार करण्यात आलेल्या स्टेडियममध्ये खेळायचे आहेत. टीम इंडिया एका गावात मुक्कामाला उतरली आहे. भारताचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंड विरुद्ध आहे.

T20 World Cup 2024 : अमेरिकेच्या 'या' गावात टीम इंडिया मुक्कामाला, वर्ल्ड कपची तयारी सुरु
Team indiaImage Credit source: Instagram/Kuldeep Yadav
Follow us
| Updated on: May 29, 2024 | 10:05 AM

IPL 2024 चा सीजन संपलाय. वेगवेगळ्या फ्रेंचायजीकडून खेळताना खेळाडूंनी आपलं कौशल्य दाखवलं. आता टीम इंडियाने परफॉर्म करण्याची वेळ आलीय. T20 वर्ल्ड कपचे पडघम वाजू लागले आहेत. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये येत्या 2 जूनपासून T20 वर्ल्ड कप 2024 सुरु होणार आहे. टीम इंडिया वर्ल्ड कप खेळण्यासाठी अमेरिकेत दाखल झालीय. तिथे पोहोचताच, जास्त वेळ न घालवता टीम इंडियाने तयारी सुरु केलीय. न्यू यॉर्कमध्ये ग्रुप राऊंड खेळणाऱ्या टीम इंडियाने याच शहराला आपल बेस बनवलय.

रोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन आहे. टीम दोन वेगवेगळ्या बॅचमध्ये न्यू यॉर्कमध्ये पोहोचली. यात मेन स्कॉडशिवाय रिजर्व खेळाडू सुद्धा आहेत. फक्त स्टार फलंदाज विराट कोहली अजूनपर्यंत पोहोचलेला नाही. व्हाइस कॅप्टन हार्दिक पांड्या न्यूयॉर्कमध्ये टीमला जॉइन झालाय. टीम इंडियाची जोरात तयारी सुरु आहे.

तयारीच्या दिशेने पहिलं पाऊल

टीम इंडियाने मंगळवारी 28 मे रोजी तयारीच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं. 2 महिन्याच व्यस्त वेळापत्रक आणि मुंबई ते न्यू यॉर्क हा मोठा प्रवास केला. दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर टीम इंडियाने सराव सुरु केलाय. न्यू यॉर्कच्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी ट्रेनिंग सुरु केलीय.

पहिल्या दिवशी प्रॅक्टिस कशी होती?

ट्रेनर्सच्या देखरेखीखाली पहिल्या दिवशी पळण्याचा हलका सराव केला. त्यानंतर एक्सरसाइजने वॉर्म-अप केलं. त्यानंतर आपसात फुटबॉल खेळून फिटनेस तपासला. पहिल्यादिवशी टीम इंडियाने बॅटिंग, बॉलिंग किंवा फिल्डिंग प्रॅक्टिस केली नाही. प्रॅक्टिस दुसऱ्या दिवशी सुरु होण्याची शक्यता आहे.

टीम इंडिया मुक्कामाला कुठल्या गावात?

न्यू यॉर्कच्या नासो काऊंटीमध्ये स्टेडियम बनवण्यात आलय. तिथे T20 वर्ल्ड कपचे सामने होणार आहेत. टीम इंडिया ग्रुप स्टेजमधील चारपैकी तीन सामने याच स्टेडियममध्ये खेळणार आहे. भारतीय टीम वेन्यूच्या जवळच मुक्कामाला आहे. नासो काऊंटीमधील गार्डन सिटी एक मोठ गाव आहे. टीम इंडिया तिथे उतरली आहे. हे गाव असलं तरी छोट शहरच आहे. याची लोकसंख्या 23 हजारपेक्षा जास्त आहे. स्टेडियमपासून काही किलोमीटर अंतरावर हे गाव आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.