विश्वविजेता भारतीय संघाचा सन्मान करण्यासाठी BCCI कडे पैसे नव्हते…लता मंगेशकरचा करावा लागला होता शो

Team India Return From Barbados, Welcome Ceremony: कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 1983 मध्ये दोन वेळा विश्वविजेत्या वेस्ट इंडिजचा 43 धावांनी पराभव केला होता. तो भारताला मिळालेला पहिला विश्वचषक होता. या विजय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआयकडे पैसे नव्हते. यामुळे प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी संगीत मैफल करून निधी उभारला.

विश्वविजेता भारतीय संघाचा सन्मान करण्यासाठी BCCI कडे पैसे नव्हते...लता मंगेशकरचा करावा लागला होता शो
१९८३ आणि २०२४ मधील विजेता टीम
Follow us
| Updated on: Jul 05, 2024 | 7:04 AM

Team India Return From Barbados, Welcome Ceremony: टी 20 विश्वचषकातील भारतीय संघ मायदेशात दाखल झाला आहे. गुरुवारी टीम इंडिया दिल्लीत दाखल झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भारतीय संघाचा कार्यक्रम आहे. त्यासाठी सकाळी 9.30 वाजता भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाकडे निघणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा टीम इंडियाचे खेळाडू करणार आहे. संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाचे आगमन होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 ते 7 भारतीय संघाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. 7 ते 7.30 दरम्यान भारतीय संघाचा गौरव समारंभ होणार आहे. आज विश्वविजेता टीम इंडियाचे जल्लोषात स्वागत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ करत आहे. परंतु पहिल्यांदा भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचे स्वागत करण्यासाठी बीसीसीआयकडे पैसे नव्हते. त्यावेळी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा कार्यक्रम भारतीय संघाला करावा लागला.

आता टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचे बक्षीस

मुंबई संघाची गुरुवारी नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत खुल्या छतावरील बसमधून विजयी परेड निघणार आहे. यानंतर बीसीसीआय टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचे बक्षीस देणार आहे. परंतु एक काळ असा होता की 1983 च्या विश्वविजेत्या कपिल देवच्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआयकडे पैसे नव्हते. त्यावेळी प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना पुढे यावे लागले. लतादीदींनी संगीत मैफल करून टीम इंडियासाठी निधी उभा केला. त्यानंतर प्रत्येक खेळाडूला एक एक लाख रुपये मिळाले.

हे सुद्धा वाचा

रोहित शर्माचा विश्वविजेता संघ

लता मंगेशकर यांची संगीत मैफील

कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 1983 मध्ये दोन वेळा विश्वविजेत्या वेस्ट इंडिजचा 43 धावांनी पराभव केला होता. तो भारताला मिळालेला पहिला विश्वचषक होता. या विजय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआयकडे पैसे नव्हते. यामुळे प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी संगीत मैफल करून निधी उभारला. त्यानंतर भारतीय खेळाडूंना प्रत्येकी एक लाख रुपये दिले गेले.

कपिलदेव विश्वविजेतेपदाची ट्रॉफी घेताना

रोहित शर्माच्या टीम इंडियाचा कार्यक्रम

  • 06:00 hrs: दिल्ली विमानतळावर आगमन
  • 06:45 तास: ITC मौर्या, दिल्ली येथे आगमन
  • 09:00 वाजता: ITC मौर्य येथून पंतप्रधान कार्यालयासाठी प्रस्थान
  • 10:00 – 12:00 वाजता: पंतप्रधान कार्यालयात समारंभ
  • 12:00 वाजता : ITC मौर्या साठी प्रस्थान
  • दुपारी 12:30: ITC मौर्या येथून विमानतळासाठी प्रस्थान
  • 14:00 वाजता: मुंबईसाठी प्रस्थान
  • 16:00 तास: मुंबई विमानतळावर आगमन
  • 17:00 वाजता: वानखेडे स्टेडियमवर आगमन
  • 17:00 – 19:00 वाजता: खुल्या बसमधून विजयी मिरवणूक
  • 19:00 – 19:30 वाजता: वानखेडे स्टेडियमवर छोटा समारंभ
  • 19:30 वाजता: हॉटेल ताजसाठी प्रस्थान
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.