Team India Return From Barbados, Welcome Ceremony: टी 20 विश्वचषकातील भारतीय संघ मायदेशात दाखल झाला आहे. गुरुवारी टीम इंडिया दिल्लीत दाखल झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भारतीय संघाचा कार्यक्रम आहे. त्यासाठी सकाळी 9.30 वाजता भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाकडे निघणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा टीम इंडियाचे खेळाडू करणार आहे. संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाचे आगमन होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 ते 7 भारतीय संघाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. 7 ते 7.30 दरम्यान भारतीय संघाचा गौरव समारंभ होणार आहे. आज विश्वविजेता टीम इंडियाचे जल्लोषात स्वागत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ करत आहे. परंतु पहिल्यांदा भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचे स्वागत करण्यासाठी बीसीसीआयकडे पैसे नव्हते. त्यावेळी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा कार्यक्रम भारतीय संघाला करावा लागला.
मुंबई संघाची गुरुवारी नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत खुल्या छतावरील बसमधून विजयी परेड निघणार आहे. यानंतर बीसीसीआय टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचे बक्षीस देणार आहे. परंतु एक काळ असा होता की 1983 च्या विश्वविजेत्या कपिल देवच्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआयकडे पैसे नव्हते. त्यावेळी प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना पुढे यावे लागले. लतादीदींनी संगीत मैफल करून टीम इंडियासाठी निधी उभा केला. त्यानंतर प्रत्येक खेळाडूला एक एक लाख रुपये मिळाले.
कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 1983 मध्ये दोन वेळा विश्वविजेत्या वेस्ट इंडिजचा 43 धावांनी पराभव केला होता. तो भारताला मिळालेला पहिला विश्वचषक होता. या विजय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआयकडे पैसे नव्हते. यामुळे प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी संगीत मैफल करून निधी उभारला. त्यानंतर भारतीय खेळाडूंना प्रत्येकी एक लाख रुपये दिले गेले.