T20 World Cup 2024 : टीम इंडियाची विजयी मिरवणूक कधी? मायदेशी परतायला इतका वेळ का लागणार?

T20 World Cup 2024 : टीम इंडिया 17 वर्षानंतर पुन्हा एकदा T20 क्रिकेटमध्ये चॅम्पियन बनली आहे. आता सर्वांना प्रतिक्षा आहे ती टीम इंडियाच्या मायदेशी परतण्याची. क्रिकेट चाहत्यांना आपल्या टीमच्या विजयात सहभागी व्हायच आहे. टीम इंडिया मायदेशी कधी परतणार? दुबईवरुन खेळाडू मुंबईला जाणार की, दिल्लीला? या बद्दल जाणून घ्या.

T20 World Cup 2024 : टीम इंडियाची विजयी मिरवणूक कधी? मायदेशी परतायला इतका वेळ का लागणार?
team indiaImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 30, 2024 | 2:07 PM

रोमांचक सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी हरवून दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकला. रोहितच्या टीम इंडियाने T20 मधील 17 वर्षांपासूनचा वर्ल्ड कप विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. फक्त सात महिन्यांपूर्वी 19 नोव्हेंबर 2023 रोजी 50 ओव्हरच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताच वर्ल्ड कप विजयाच स्वप्न भंग पावलं होतं. त्यावेळी कोट्यवधी भारतीयांच मन मोडलं होतं. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर मात केली होती. आता T20 वर्ल्ड कप विजयाच देशभर सेलिब्रेशन सुरु आहे.

दिल्ली, मुंबई, लखनऊ, भोपाळ, जयपूर, चंदीगड उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सर्वत्र टीम इंडियाच्या विजयाचा फक्त जल्लोष दिसला. टीम इंडियाच्या खेळाडूंनी मैदानावर सेलिब्रेशन केलं, तर सर्वसामान्यांनी रस्त्यावर फटाके फोडून, तिरंगा फडकवून सेलिब्रेशन केलं. आता सगळ्यांना प्रतिक्षा आहे ती, टीम इंडियाच्या मायदेशी परतण्याची. मायदेशात टीम इंडियाच भव्य स्वागत होणार आहे.

भारतात परतण्याचा प्रवास कसा असेल?

टीम इंडिया आज बारबाडोसमध्येच आहे. 30 जून वर्ल्ड कपसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला होता. सोमवारी टीम इंडिया 11 वाजता बारबाडोसवरुन न्यू यॉर्कसाठी रवाना होईल. मंगळवारी न्यू यॉर्क येथून एमिरेट्स फ्लाइटने दुबईला जाणार आहे. तिथून टीम इंडिया भारतात येईल. बुधवारपर्यंत टीम इंडिया भारतात येऊ शकते.

विजयी मिरवणूक कधी?

अजून हे ठरलेलं नाहीय की दुबईवरुन खेळाडू मुंबईला जाणार की, दिल्लीला?. याची डिटेल माहिती आज येऊ शकते. त्यानंतर टीम इंडियाची विजयी मिरवणूक निघेल, त्याच शेड्युलड अजून आलेलं नाही. भारत चार वर्ल्ड कप जिंकणारा क्रिकेट विश्वातील तिसरा संघ बनलाय. याआधी ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या नावावर हा रेकॉर्ड आहे. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 7 वेळा आणि वेस्ट इंडिजने चारवेळा वर्ल्ड कप जिंकलाय.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.