Sarfaraz khan | डेब्युमध्येच हाफ सेंच्युरी झळकवणाऱ्या सरफराजला BCCI कडून सुखद धक्का, मोठ सरप्राइज, VIDEO
Sarfaraz khan | सरफराज खानने डेब्युमध्येच कमाल केली. खास इनिंग खेळून त्याने डेब्यु संस्मरणीय बनवला. त्याने 48 चेंडूत हाफ सेंच्युरी झळकवली. पहिल्याच कसोटीत सरफराज इंग्लंडच्या स्पिनर्स विरुद्ध जबरदस्त खेळला. त्याच्या बॅटिंगने अनेकांना प्रभावित केलं.
Sarfaraz khan | भारत आणि इंग्लंडमध्ये राजकोट येथे तिसरा कसोटी सामना सुरु आहे. ही टेस्ट मॅच सरफराज खान आणि त्याच्या कुटुंबासाठी खास आहे. आपला मुलगा एकदिवस टीम इंडियाकडून खेळेल हे स्वप्न या कुटुंबाने पाहिलं होतं. 15 फेब्रुवारीला राजकोटच्या स्टेडियमध्ये हा स्वप्न प्रत्यक्षात उतरलं. बऱ्याच प्रतिक्षेनंतर सरफराज खानला टीम इंडियात डेब्युची संधी मिळाली. टेस्ट मॅचच्या सुरुवातीला सकाळी सरफराजसोबत त्याचे वडील होते. खेळ संपल्यानंतर मुशीर खान आपल्या भावाच्या आनंदात सहभागी झाला. त्यावेळी सरफराजने भावाला स्वत:च्या फलंदाजीबद्दल काही प्रश्न विचारले.
सरफराजला टीम इंडियाची कॅप मिळाली, त्यावेळी वडिल खूपच भावूक झाले होते. नौशान खानने मुलाला मिठी मारत भारतीय टीमच्या कॅपच चुंबन घेतलं. त्यावेळी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण त्यांना कठीण गेलं. त्यानंतर सरफराजने आपल्या बॅटिंगची ताकत दाखवली. बऱ्याच महिन्यांपासून सरफराजला टीममध्ये संधी देण्याची मागणी होत होती.
सरफराजसाठी काय सरप्राइज होतं?
आपल्या पहिल्याच इनिंगमध्ये 66 धावा फटकावणाऱ्या सरफराजला एक सुंदर सरप्राइज मिळालं. छोटा भाऊ मुशीर खानसोबत बोलताना त्याला हे सरप्राइज मिळालं. बीसीसीआयने एका स्पेशल व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून दोन्ही भावांच बोलण घडवून आणलं. तो सरफराजसाठी हा एक सुखद धक्का होता. दोन्ही बंधुंनी सरफराजच्या इनिंगबद्दल चर्चा सुरु केली. सरफराजने आपल्या बॅटिंगबद्दल मुशीरला विचारलं, तेव्हा इतरांप्रमाणे त्याने सुद्धा सरफराजने पहिल्या डावात कमाल केल्याच सांगितलं.
𝗦𝘂𝗿𝗽𝗿𝗶𝘀𝗲 𝗦𝘂𝗿𝗽𝗿𝗶𝘀𝗲!
A special phone call 📱 after a memorable Test Debut!#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/QcAFa5If9o
— BCCI (@BCCI) February 15, 2024
मुशीरला कधी भिती वाटली?
नुकतीच अंडर-19 टीम इंडिया वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली होती. मुशीर त्या टीमचा भाग होता. भावाची बॅटिंग सुरु असताना मुशीरला एक क्षण भिती वाटली होती. रुटच्या गोलंदाजीवर बॉल बॅटच्या कडेला लागून हवेत उडाला, त्यावेळी भिती वाटल्याच मुशीरने सफराजला सांगितलं. बॅटिंग करताना मला जेव्हा कधी अडचण येते, तेव्हा मी मुशीरला पाहतो. कारण दोघांची बॅटिंगची पद्धत एकसारखीच आहे.