IND vs ENG : चौथी कसोटी ओवलच्या मैदानावर, विजयासाठी ‘या’ माजी भारतीय खेळाडूकडून शिकवणी गरजेची
पहिली कसोटी पावसामुळे अनिर्णीत सुटली. त्यानंतर दुसरी कसोटी भारताने तर तिसरी कसोटी इंग्लंडने जिंकली आहे. त्यामुळे स्पर्धेत सध्या दोन्ही संघ 1-1 च्या बरोबरीत आहेत. या सर्वामुळे आता चौथा सामना महत्त्वाचा आणि चुरशीचा असणार आहे.
Ind vs Eng : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत दुसऱ्या सामन्यात लॉर्डच्या मैदानात ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाला हेंडिग्ले येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत(India Vs England, 3rd Test) मात्र एक डाव आणि 76 धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे मालिकेत दोन्ही संघ 1-1 गुण मिळवत बरोबरीत असून त्यामुळेच चौथी कसोटी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान विजयासाठी भारताने एका माजी दिग्गज भारतीय क्रिकेटपटूकडून शिकवणी घेणे गरजेचे गरजेचे आहे. कारण या खेळाडूने ओवलच्या मैदानावर महत्त्वाच्या सामन्यात द्विशतक ठोकलं आहे. तसंच भारताने इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी विजय आणि मालिका विजय ओवलच्याच मैदानावर 50 वर्षांपूर्वी साजरा केला आहे.
तर भारतासाठी ओवलच्या मैदानालर अप्रतिम दुहेऱी शतकाची खेळी करणारा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून भारताचा ‘द वॉल’ अर्थात राहुल द्रविड (Rahul Dravid) आहे. राहुलने ओवलच्या मैदानात 3 कसोटी सामन्यात 110 च्या सरासरीने 443 धावा ठोकल्या होत्या. ज्यामध्ये एका दुहेरी शतकासह, एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. 2002 या वर्षी ओवलच्या मैदानात द्रविडने 217 धावांची धमाकेदार खेळी करत सामना ड्रॉ करण्यात यश मिळवलं होतं. सामन्यात द्रविडसह सचिन (54) आणि सौरव (51) यांची खेळीही महत्त्वाची ठरली होती. ज्यामुळे भारत 508 धावांचा स्कोर उभा करु शकला होता. त्यानंतर 2007 मध्ये 55 आणि 2011 मध्ये नाबाद 146 धावांची खेळीही द्रविडने या मैदानावर केली होती. ज्यामुळे अवघड परिस्थितीत ओवलच्या मैदानावर इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना कसा करायचा हे द्रविडला माहित आहे. त्यामुळे सध्या अडचणीत असलेल्या भारतीय फलंदाजानी द्रविडकडून सामन्यापूर्वी टिप्स घेणे गरजेचे आहे.
भारत आणि ओवलचं मैदान
ओवलच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात 12 वेळा कसोटी सामने खेळवले गेले आहेत. ज्यात चार वेळा इंग्लंडने तर एका वेळेस भारताने विजय मिळवला आहे. याशिवाय 7 सामने अनिर्णीत सुटले आहेत. विशेष म्हणजे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना याच मैदानावर 1936 मध्ये खेळवला गेला होता. ज्यात इंग्लंडने नऊ विकेट्सनी विजय मिळवला होता. तर या मैदानावर अखेरचा सामना 2018 साली खेळवला गेला असून यातही इंग्लंडनेच 118 धावांनी विजय मिळवला आहे. तसंच दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेने त्याच्या कारकिर्दीत ठोकलेल्या एकमेव शतकाच्या जोरावर 2007 साली भारताने ओवलच्या मैदानावर 664 धावांचा डोंगर उभा केला होता. यावेळी दिनेश कार्तिकने 91, राहुल द्रविडने 55, सचिन तेंडुलकरने 81, लक्ष्मणने 51 आणि महेंद्र सिंह धोनीने 92 धावांची खेली खेळी होती.
हे ही वाचा :
तिसऱ्या कसोटीत पराभूत होणारी टीम इंडिया ‘युजलेस’; मायकल वॉनचा विराटसेनेवर वार
(Team india should learn from rahul dravid if want to win 4th test on oval ground)