Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आता कायमस्वरुपी वानखेडे स्टेडियमवर येणार वास्तव्याला, VIDEO
Sachin Tendulkar : देशभरातील सचिन तेंडुलकरच्या लाखो चाहत्यांना आता डोळेभरुन सचिनला डोळ्यात साठवता येईल. सचिनच्या उपस्थितीमुळे वानखेडे स्टेडियमवर येणाऱ्या प्रेक्षकांचा उत्साह आणखी दुप्पट होईल.
मुंबई : भारतात क्रिकेटचा देव म्हणून सचिन तेंडुलकरकडे पाहिलं जातं. सचिनने क्रिकेटच्या मैदानात हुकूमत गाजवली. सचिनने क्रिकेट खेळताना भल्या-भल्या गोलंदाजांना सळो की, पळो करुन सोडलं. सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या मैदानातून निवृत्त झाला आहे, पण त्याच्या चाहत्यांची संख्या मात्र जराही कमी झालेली नाही. आजही कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांच्य मनावर सचिन तेंडुलकरच गारुड आहे. आता मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरचा स्टॅच्यू बसवला जाणार आहे. मुंबई क्रिकेट असोशिएशनकडून सचिनचा हा स्टॅच्यू बसवला जाणार आहे.
सचिन स्वत: काय म्हणाला?
वानखेडेवर सचिनचा स्टॅच्यू कुठे बसवायचा हे ठरवण्यासाठी सचिन स्वत: मंगळवारी पत्नी अंजलीसोबत वानखेडे स्टेडियममध्ये आला होता. “हा स्टॅच्यू म्हणजे माझ्यासाठी आश्चर्याचा सुखद धक्का आहे. माझं करिअर इथे सुरु झालं. अविश्वसनीय आठवणींचा हा एक प्रवास आहे. 2011 साली आम्ही इथे वर्ल्ड कप जिंकला, हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण होता” असं सचिनने सांगितलं.
करिअरमधील शेवटची कसोटी इथेच
आज सचिन वानखेडे स्टेडियमवर आला, त्यावेळी मुंबई क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष अनमोल काळेसुद्धा सोबत होते. वर्ष 2013 मध्ये सचिन याच वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट करिअरमधील शेवटचा कसोटी सामना खेळला.
#WATCH | Mumbai: On his life-size statue being erected inside Wankhede stadium by MCA, Cricket legend Sachin Tendulkar says, “Pleasant surprise. My career started here. It was a journey with unbelievable memories. Best moment of my career came here when we won 2011 World Cup…” pic.twitter.com/OAHPP7QkSB
— ANI (@ANI) February 28, 2023
कधी होणार अनावरण?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सचिन तेंडुलकरच्या या स्टॅच्यूच अनावरण त्याच्या 50 व्या वाढदिवशी किंवा वर्ल्ड कप दरम्यान होईल. सचिन 24 एप्रिलला 50 व्या वर्षात पदार्पण करेल. रिपोर्ट्सनुसार, सचिन तेंडुलकरचा वानखेडे स्टेडिममधील हा पहिला स्टॅच्यू आहे. “सचिन भारतरत्न आहे. क्रिकेटसाठी सचिनने सर्वकाही केलं. हे सर्वांना ठाऊक आहे. 50 व्या वाढदिवशी एमसीएकडून सचिनला हे छोटस गिफ्ट आहे” असं काळे म्हणाले. 3 आठवड्यांपूर्वी चर्चा
“जवळपास 3 आठवड्यांपूर्वी या बद्दल सचिन बरोबर चर्चा झाली होती. सचिन तेंडुलकर यांची सहमती होती” असं काळे यांनी सांगितलं. या स्टेडियममध्ये सचिनच्या नावाने एक स्टँडही आहे.