IND vs ENG | विराट कोहलीबद्दल महत्त्वाची अपडेट, करिअरमध्ये पहिल्यांदाच पहावा लागला असा दिवस

IND vs ENG Test Series | विराट कोहलीच्या बाबतीत भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात जी भिती होती अखेर तेच घडलय. इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरीज सुरु होण्याच्या 3 दिवस आधी कोहलीने अचानक माघार घेतली होती. विराट कोहलीच्या आयुष्यात असा काय प्रॉब्लेम आहे?

IND vs ENG | विराट कोहलीबद्दल महत्त्वाची अपडेट, करिअरमध्ये पहिल्यांदाच पहावा लागला असा दिवस
Virat Kohli
Follow us
| Updated on: Feb 10, 2024 | 11:25 AM

IND vs ENG Test Series | अखेर भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात जी भिती होती, तेच घडलय. मागच्या दोन कसोटी सामन्यात विराट कोहली खेळला नव्हता. त्याची टीममध्ये निवड झाली होती. पण त्याने अचानक माघार घेतली होती. विराट कोहलीच्या या माघार घेण्यामागे फॅमिली इमर्जन्सी असल्याच बोलल जात होतं. अजून ते कारण समोर आलेलं नाही. काहींनी अनुष्का शर्मा पुन्हा प्रेग्नेंट असल्याचा अंदाज बांधला होता. दोन कसोटी सामन्यात विराट कोहली खेळला नाही. आता भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरीजमध्ये विराट कोहली खेळण्याची शेवटची अपेक्षा सुद्धा संपलीय. विराट उर्वरित 3 कसोटी सामन्यात सुद्धा खेळणार नाहीय. स्टार क्रिकेटर विराट कोहलीने या बद्दल भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाला कळवलय. कोहली पहिल्या दोन कसोटीत खेळला नाही, त्यानंतर तो तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत खेळणार नाही, असं बोलल जात होतं. पण आता तो या सीरीजमधूनच आऊट झालाय.

मागच्या काही दिवसांपासून तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा कधी करणार? याची प्रतिक्षा केली जातेय. विराट कोहलीच्या उपलब्धेतबद्दल स्थिती स्पष्ट नसल्याने टीमची घोषणा होत नव्हती. शुक्रवारी कोहलीने बीसीसीआयला पुढच्या 3 कसोटी सामन्यात खेळणार नसल्याच सांगितलं. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलय. शुक्रवारी सिलेक्शन कमिटीची बैठक झाली.

करिअरमध्ये पहिल्यांदाच असं झालं

विराट कोहली या पाच सामन्यांच्या टेस्ट सीरीजमध्ये एकही कसोटी सामना खेळणार नाहीय. 2011 साली टेस्ट डेब्यु करणाऱ्या विराट कोहलीला आपल्या संपूर्ण करिअरमध्ये पहिल्यांदा असा दिवस पहावा लागलाय. मायदेशात झालेल्या टेस्ट सीरीजमध्ये विराट कोहली एकही टेस्ट मॅच न खेळण्याची ही पहिली वेळ आहे. याआधी सुद्धा काहीवेळा अस झालय. कोहली त्यावेळी टेस्ट सीरीजच्या एकाही सामन्यात खेळला नव्हता. पण पहिल्यांदाच होम टेस्ट सीरीजमध्ये न खेळताच विराट कोहली बाहेर गेलाय.

राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेला सुद्धा नाही गेला

माजी भारतीय कॅप्टन विराट कोहलीला टेस्ट सीरीजच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी निवडण्यात आलं होतं. टीमसोबत तो हैदराबादमध्ये पोहोचला होता. तिथे त्याने एकदिवसाच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये सुद्धा भाग घेतला. त्यानंतर दुसऱ्यादिवशी 22 जानेवारीला राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी व्हायच होतं. पण तो तिथे गेला नाही.

त्याचदिवशी बीसीसीआयने कोहलीने दोन्ही कसोटी सामन्यातून माघार घेतल्याच जाहीर करुन सर्वांना धक्का दिला. कौटुंबिक इमर्जन्सीमुळे कोहलीने हा निर्णय घेतल्याच भारतीय बोर्डाने प्रेस रिलीजमध्ये म्हटलं होतं.

'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.