चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार? क्रीडा मंत्र्यांची सावध प्रतिक्रिया
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी पुढील दहा वर्षांचे व्यस्त वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानला 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी यजमान देश म्हणून घोषित करण्यात आले
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी पुढील दहा वर्षांचे व्यस्त वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानला 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी यजमान देश म्हणून घोषित करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, जवळपास तीन दशकांनंतर पाकिस्तान आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेचे आयोजन करेल. (Team India to travel to Pakistan for Champions Trophy? Sports Minister Anurag Thakur answers)
पाकिस्तानला आयसीसी स्पर्धेचे यजमानपद मिळाल्यानंतर भारतात विविध चर्चांना उधाण आले आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार की नाही, या प्रश्नावर क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आपले मत मांडले. ठाकूर म्हणाले की, तेव्हाच्या परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल.
‘आज तक’च्या प्रश्नाला उत्तर देताना अनुराग ठाकूर म्हणाले, “वेळ आल्यावर काय करायचे ते पाहू. यामध्ये गृह मंत्रालयाचा सहभाग असेल. जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धा असतात तेव्हा बऱ्याच गोष्टींची चाचपणी करावी लागते.” अनेक देशांनी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली, कारण तेथील परिस्थिती चांगली नाही. सुरक्षेच्या कारणास्तव परिस्थिती अत्यंत बिकट असून ती चिंताजनक आहे. त्यामुळे तिथली परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागतो.
2012-13 मध्ये अखेरची द्विपक्षीय मालिका
राजकीय आणि डिप्लोमॅटिक संबंध बिघडल्यामुळे भारत-पाकिस्तान संघ अद्याप द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत. फक्त आयसीसी स्पर्धांमध्येच दोन्ही देश आमनेसामने येतात. दोन्ही देशांदरम्यान शेवटची द्विपक्षीय मालिका 2012-13 मध्ये झाली होती. तेव्हा पाकिस्तानने तीन एकदिवसीय आणि दोन टी-20 सामन्यांसाठी भारताचा दौरा केला होता. पाकिस्तान संघाने एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकली होती, तर टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. तर 2008 पासून भारतीय संघाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही.
क्रिकेट वर्तुळात चर्चा
2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्राफी स्पर्धेचं यजमानपद आयसीसीने पाकिस्तानला दिलं आहे. पाकिस्तान या स्पर्धेचं आयोजन करणार आहे. भारतीय संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानला जाईल का? की भारत या स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेईल? याबाबत क्रिकेटरसिकांमध्ये चर्चा सुरु आहेत. दरम्यान, काहींना असं वाटतंय की, पाकिस्तानमधील परिस्थिती बिघडली तर कदाचित या स्पर्धेचं यजमानपद दुसऱ्या संघाकडे दिलं जाऊ शकतं. तर काहींना वाटतं की, कदाचित पाकिस्तान या स्पर्धेचं आयोजन यूएईत करु शकतो.
आयसीसीच्या कार्यक्रमांची यादी
- 2024 टी20 वर्ल्ड कप- वेस्ट इंडीज आणि अमेरिका
- 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी – पाकिस्तान
- 2026 टी20 वर्ल्ड कप – भारत आणि श्रीलंका
- 2027 वर्ल्ड कप – दक्षिण आफ्रीका, जिम्बाब्वे आणि नामीबिया
- 2028 टी20 वर्ल्ड कप – ऑस्ट्रेलिया आणि न्यूजीलैंड
- 2029 चॅम्पियन्स ट्रॉफी – भारत
- 2030 टी20 वर्ल्ड कप – इंग्लंड, आयर्लंड आणि स्कॉटलंड
- 2031 वर्ल्ड कप – भारत आणि बांग्लादेश
Are you ready for the best-ever decade of men’s white-ball cricket?
Eight new tournaments announced ? 14 different host nations confirmed ? Champions Trophy officially returns ?https://t.co/OkZ2vOpvVQ pic.twitter.com/uwQHnna92F
— ICC (@ICC) November 16, 2021
इतर बातम्या
IND vs NZ Head to Head Records in T20Is : टीम इंडिया की न्यूझीलंड, जयपूरमध्ये कोणाचं पारडं जड?
आंतरराष्ट्रीय सामन्यात 27 धावांत संघ ऑलआऊट, 7 खेळाडू शून्यावर बाद, वाचा कुठे घडला ‘हा’ अजब सामना
IND vs NZ: रोहित शर्माच्या कर्णधार असताना विराट संघात काय करणार?, रोहितनेच दिलं उत्तर
(Team India to travel to Pakistan for Champions Trophy? Sports Minister Anurag Thakur answers)