IND vs WI : Virat Kohli वॉर्मअप मॅचमध्ये फेल, फक्त इतक्या रन्सवर OUT, कोणी काढली विकेट? VIDEO
IND vs WI : Virat Kohli एकच चूक कितीवेळा करणार?. असं वाटलं की, विराट कोहली चांगला समाचार घेईल. पण नेट प्रॅक्टिसवरुन मॅच प्रॅक्टिससाठी मैदानात उतरताच विराट कोहलीची पोलखोल झाली.
नवी दिल्ली : चूक एकदा झाली तर ठीक आहे. पण तीच चूक वारंवार होत असेल, तर ती चूक राहत नाही. विराट कोहली सध्या अशीच एक चूक वारंवार करतोय. वेस्ट इंडिजमध्ये टीम इंडियाचा सराव सामना सुरु आहे. तिथे सुद्धा विराटने जुन्या चुकीची पुनरावृत्ती केली. परिणामी वॉर्म अप मॅचमध्ये विराट कोहली फ्लॉप ठरला. वेस्ट इंडिज विरुद्ध टेस्ट सीरीज 12 जुलैपासून सुरु होणार आहे. वॉर्मअप मॅचच्या निमित्ताने टीम इंडिया तयारीची चाचपणी करत आहे.
टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंची दोन टीम्समध्ये विभागणी करुन मॅच खेळवली जात आहे. दोन्ही टीम्स पूर्ण होण्यासाठी वेस्ट इंडिजच्या 8 क्रिकेटपटूंचा या मॅचमध्ये समावेश करण्यात आलाय.
वॉर्म अप मॅचमध्ये फेल
5 आणि 6 जुलै असे दोन दिवस ही वॉर्म अप मॅच होणार आहे. पहिल्यादिवशी विराट कोहली बॅटिंगसाठी उतरला. नेट्समध्ये विराट कोहलीच्या सरावाचे जे फोटो, व्हिडिओ समोर आले होते, ते पाहून असं वाटलं की, विराट कोहली चांगला समाचार घेईल. पण नेट प्रॅक्टिसवरुन मॅच प्रॅक्टिससाठी मैदानात उतरताच विराट कोहलीची पोलखोल झाली.
पुन्हा तशीच चूक
मैदान, देश आणि परिस्थिती जरुर बदलली आहे. पण विराट कोहलीमध्ये जो बदल दिसणं अपेक्षित होतं. तो दिसला नाही. विराट कोहलीने इथे सुद्धा तीच चूक केली. बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडण्याचा मोह त्याला आवरला नाही. पुन्हा एकदा स्लीपमध्ये कॅच आऊट झाला.
Virat Kohli’s dismissal in the practice match in Barbados today. Jaydev Unadkat claimed his wicket. #WIvIND
Video courtesy: Vimal Kumar pic.twitter.com/IltleUGgwy
— Farid Khan (@_FaridKhan) July 5, 2023
विराट कोहलीला कोणी आऊट केलं?
विराट कोहली वॉर्म अप मॅचमध्ये फक्त 3 रन्सवर आऊट झाला. डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने त्याला आऊट केलं. विराट कोहली याआधी सुद्धा स्लीपमध्ये कॅचआऊट झालाय. अलीकडेच WTC Final मध्ये सुद्धा हेच चित्र पाहायला मिळालं होतं. याआधी सुद्धा विराट अनेकदा स्लीपमध्ये कॅचआऊट झालाय. विराटने आपली ही चूक सुधारली, तर त्यातच टीम इंडियाचा फायदा आहे.