Team India : टीमच्या बाहेर असलेल्या Wriddhiman saha चा खूप चांगला निर्णय, कौतुक करावं तेवढं कमी
Team India च्या अन्य मोठ्या क्रिकेटर्सनी ऋद्धिमान साहाचा कित्ता गिरवायला हरकत नाही. ऋद्धिमान साहाने नकार देताना जो विचार केलाय, तो खरचं कौतुकास्पद आहे. टीम इंडियाचा पुढचा दौरा वेस्ट इंडिज विरुद्ध आहे.
नवी दिल्ली : टीम इंडियाला सध्या 1 महिन्याची रेस्ट आहे. त्यानंतर टीम इंडिया 12 जुलैपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर असणार आहे. टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर टेस्टसोबत वनडे आणि T20 सीरीज खेळणार आहे. दौऱ्याची सुरुवात टेस्ट सीरीजने होईल. डॉमिनिकाच्या विंडसर पार्कवर 12 ते 16 जुलै दरम्यान पहिली टेस्ट मॅच होईल. त्यानंतर दुसरा कसोटी सामना 20 ते 24 जुलै दरम्यान त्रिनिदादच्या क्वीन्स पार्क ओव्हलवर खेळला जाईल.
टीम इडियाच्या या वेस्ट इंडिज टूरआधी टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज ऋद्धिमान साहाने एक चांगला निर्णय घेतला आहे. खरोखऱच त्याच्या या निर्णयाच कौतुक करावं तेवढं कमी आहे.
ऋद्धिमान साहाने सुद्धा दिला नकार
भारतीय क्रिकेटमधील देशांतर्गत सीजनची सुरुवात 28 जूनपासून दुलीप ट्रॉफीने होणार आहे. याच टुर्नामेंटशी संदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय. ऋद्धिमान साहाने या टुर्नामेंटमध्ये खेळायला नकार दिला आहे. इशान किशन दुलीप ट्रॉफीमध्ये इस्ट झोनच्या टीमकडून खेळणार होता. पण वेस्ट इंडिज दौऱ्यामुळे त्याने आपलं नाव मागे घेतलं. त्यानंतर ऋद्धिमान साहाला विचारण्यात आलं. पण त्याने सुद्धा नकार दिलाय. त्याच्यामागच कारणही त्याने सांगितलं.
ऋद्धिमान साहाने काय सांगितलं?
विकेटकीपर फलंदाजाने या निर्णयामागच कारण सांगितलं. “दुलीप ट्रॉफी युवा खेळाडूंसाठी आहे. मी टुर्नामेंटमध्ये खेळलो, तर एखाद्या युवा खेळाडूचा मार्ग बंद होईल. यामध्ये अर्थ नाही” म्हणून ऋद्धिमान साहाने नकार दिला. इस्ट झोनच्या टीममधून खेळण्यासाठी सिलेक्टर्सनी IPL 2023 मध्ये खेळणारा युवा क्रिकेटर अभिषेक पोरेलची निवड केली. सिलेक्टर्सनी सल्ल्याकडे केलं दुर्लक्ष
नुकतीच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल झाली. त्यामध्ये ऋद्धिमान साहाला स्थान देण्याची काही दिग्गज क्रिकेटपटूंनी सूचना केली होती. पण सिलेक्टर्सनी केएस भरत आणि इशान किशनची निवड केली. केएस भरतला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली होती. पण तो प्रभाव पाडू शकला नाही. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 209 धावांनी पराभव केला. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा किताब जिंकण्याची संधी गमावली.